May 18, 2024

६०व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत अभिजीत गुप्ता, अभिमन्यू पुराणिक, सेतुरामन एसपी, सुर्य शेखर गांगुली यांची विजयी सलामी

पुणे, 16 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित ६०व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत पुण्याचा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक, अभिजीत गुप्ता, सेतुरामन एसपी, सुर्य शेखर गांगुली यांनी विजयी सलामी दिली. 
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉल अभिमन्यू पुराणिक ने देवांश सिंग याच्यावर 35 चालीमध्ये निर्णायक विजय मिळवताना 1गुण प्राप्त केला. पटावरील स्थिती गुंतागुंतीची होती परंतु मी संपूर्ण सामन्यात वर्चस्वाची स्थिती कायम राखली, असे सांगताना अभिमन्यूने विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची प्रशंसा केली. तसेच कँडीडेटस स्पर्धेसाठी विश्वचषक स्पर्धेतून किमान दोन भारतीय खेळाडू पात्र ठरतील अशी आशा त्याने व्यक्त केली. 
 
ग्रँड मास्टर अभिजीत गुप्ताने झारखंडच्या अनिस सिकंदर याच्यावर 26 चालीमध्ये निर्णायक विजय मिळवला. तर अन्य सामन्यात ग्रँड मास्टर पीएसपीबीच्या सेतुरामन एसपी याने पश्चिम बंगालच्या सांपर्य घोषला 44 चालीमध्ये नमविले. सध्या अतिशय फॉर्ममध्ये सेतुरामनने एकापाठोपाठ एक कल्पक चाली रचताना प्रतिस्पर्ध्याला संधी दिली नाही. 
 
आणखी एका पीएसपीबीच्या सुर्य शेखर गांगुलीने कर्नाटकाच्या मितुल केएच याच्यावर विजय मिळवला. या प्रदीर्घ लढतीत मितुलने गांगुलीला त्याच्या प्रत्येक डावपेचाला तोडीस तोड उत्तर दिले. बरोबरीत चाललेल्या या डावात अखेरीस मितुल ला वेळेच्या कमतरतेचा सामना करावा लागला. त्यामूळे त्या दडपणाखाली त्याच्या चुका झाल्या. गांगुलीने त्याचा फायदा घेत आपल्या अनुभवाच्या जोरावर शहमात करण्याचा इशारा देताच मितुलने शरणागती पत्करली. 
 
या स्पर्धेचे उद्घाटन  उच्च, तंत्र शिक्षण मंत्री व  पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, आशियाई बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष भरतसिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर आणि मानद सचिव श्री. निरंजन गोडबोले, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, राजेंद्र शिदोरे, चीफ आर्बीटर गोपा कुमार एम एस , दिप्ती शिदोरे,अथर्व गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
अभिजीत गुप्ता(पीएसपीबी)(1गुण) वि.वि.वि.अनिस सिकंदर(झारखंड)(0गुण);
देवांश सिंग(मध्यप्रदेश)(0गुण) पराभुत वि.अभिमन्यू पुराणिक(एएआय)(1गुण);
सेतुरामन एसपी (पीएसपीबी)(1गुण)वि.वि.सांपर्य घोष(पश्चिम बंगाल)(0गुण);
मितुल केएच(कर्नाटक)(0गुण) पराभुत वि.सुर्य शेखर गांगुली(पीएसपीबी)(1गुण);
दिप्तयन घोष(पश्चिम बंगाल)(1गुण) वि अविज्ञान घोष(त्रिपुरा)(0गुण);
मोहिथा वाक्चेरी(आंध्रप्रदेश)(0गुण) पराभुत वि विशाख एनआर(आरएसपीबी)(1गुण);
नायक कुमार(केआयआयटी)(0गुण) पराभुत वि मित्रभा गुहा(पश्चिम बंगाल)(1गुण);
इनियान पी(तामिळनाडू)(1गुण) वि.वि.वंदन सवाई(दिल्ली)(0गुण);
मिथिरन ए(तामिळनाडू)(0गुण) पराभुत वि.विघ्नेश एनआर(आरएसपीबी)(1गुण);
सायंतन दास(आरएसपीबी)(1गुण)वि.वि.गणेश ताजणे(महा)(0गुण);
श्यामनिखिल पी(आरएसपीबी)(0.5गुण) बरोबरी वि प्रणय अकुला(तेलंगणा)(0.5गुण);
हार्दिक झा(पीएसपीबी)(0गुण) पराभुत वि आकाश जी(तामिळनाडू)(1गुण);
दीपन चक्रवर्ती जे.(आरएसपीबी)(1गुण)वि.वि.अर्शिया दास(त्रिपुरा)(0गुण);
हर्षद परुळेकर(एमपीएससीबी)(0गुण) पराभुत वि.नीलाश साहा(आरएसपीबी)(1गुण);
व्यंकटेश एमआर(पीएसपीबी)(1गुण) वि.वि शौर्य पॉल(पश्चिम बंगाल)(0गुण);
प्रशांत नाईक(कर्नाटक)(0गुण) पराभुत वि.अनुज श्रीवात्री(मध्यप्रदेश)(1गुण)