May 20, 2024

35000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत येवानवू कु, डेयॉन बॅक, दलिला जाकुपोविक, डारिया कुडाशोवा यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

नागपूर, 8 मार्च, 2024: नागपुर डिस्ट्रिक्ट हार्ड कोर्ट टेनिस असोसिएशन(एनडीएचटीए) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 35000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत येवानवू कु, डेयॉन बॅक, दलिला जाकुपोविक, डारिया कुडाशोवा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस सेंटर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या कोरियाच्या येवानवू कु हीने रशियाच्या एकतेरिना याशिनाचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली. कोरियाच्या डेयॉन बॅकने भारताच्या पाचव्या मानांकित सहजा यमलापल्लीचा 6-4, 6-1 असा पराभव सनसनाटी विजयासह उपांत्य फेरी गाठली. स्लोव्हाकियाच्या दुसऱ्या मानांकित दलिला जाकुपोविकने इटलीच्या सातव्या मानांकित मिरियाना टोनाचा 5-7, 6-1, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. रशियाच्या डारिया कुडाशोवाने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या रिनॉन ओकुवाकीचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले.

दुहेरीत उपांत्य फेरीत कोरियाच्या कु येनवू व लिथुनियाच्या जस्टिना मिकुलस्कीट यांनी भारताच्या
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी यांचा 6-2, 2-6, 10-8 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, रशियाच्या इरिना मारिया बारा व स्लोव्हाकियाच्या दलिला जाकुपोविक या अव्वल मानांकित जोडीने फ्रांसच्या यास्मिन मन्सुरी व लात्वियाच्या डायना मार्सिचेविका यांचा 7-5, 6-4 असा पराभव केला.

निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी:
येवानवू कु(कोरिया)वि.वि. एकतेरिना याशिना(रशिया)6-1, 6-0;
डेयॉन बॅक(कोरिया)वि.वि.सहजा यमलापल्ली(भारत)[5]6-4, 6-1;
दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया)[2]वि.वि.मिरियाना टोना(इटली)[7]5-7, 6-1, 6-2;
डारिया कुडाशोवा(रशिया)वि.वि.रिनॉन ओकुवाकी(जपान)6-4, 6-3;

दुहेरी: उपांत्य फेरी:
इरिना मारिया बारा(रशिया) / दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया) [1]वि.वि. यास्मिन मन्सुरी(फ्रांस)/डायना मार्सिचेविका(लात्विया)[3]7-5, 6-4

कु येनवू (कोरिया)[4] /जस्टिना मिकुलस्कीट(लिथुनिया)वि.वि.
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती ( भारत) /वैदेही चौधरी (भारत)6-2, 2-6, 10-8;