December 14, 2024

रुपे प्राईम व्हॉलिबॉल हंगाम २च्या टिव्ही दर्शकांमध्ये ५५ टक्के वाढ

नवी दिल्ली २८ मार्च २०२३ – पंधरा गुणांची रोमांचकारी पद्धत, सुपर सव्हर्स, सुपर पॉइंटस, वलयांकित खेळाडूंचा समावेश असलेले संघ, दक्षिण प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा, कल्याणी प्रियदर्शन, वलयांकित बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, अश्विन पोनप्पा, क्रिकेटपटू मयांक अगरवाल , साजन प्रकाश या प्रथितयश व्यक्तीच्या समावेश यामुळे ए२३ द्वारा पुरस्कृत करण्यात आलेल्या रुपे व्हॉलिबॉल लीगच्या दुसऱ्या हंगामाला टीव्हीवर चांगला पेक्षकवर्ग मिळाला. या वेळी टीव्ही दर्शकांमध्ये ५५ टक्के वाढ झाली. 
 
रुपे प्राईम व्हॉलिबॉल लीगच्या दुसऱ्या हंगामात अहमदाबाज डिफेंडर्स, बेंगळुरु टॉरपीडोज, कालिकत हिरोज, चेन्नई ब्लिटझ, हैदराबाद ब्लॅक हॉक्स, कोची ब्लू स्पाईकर्स, कोलकता थंडरबोल्टस, मुंबई मोटर्स यांचा समावेश आहे. या लीगचे सोनी वाहिनीवरून इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांत प्रसारण करण्यात आले. या दुसऱ्या हंगामातील सर्व सामने आणि क्षणचित्रे मिळवून टीव्ही दर्शकसंख्या १३३ दशलक्षवरून २०६ दशलक्षपर्यंत वाढली. 
 
या लीगसाठी पुरुषांइतकेच महिला दर्शकही मिळाले. पुरुष आणि महिला दर्शकांची विभागणी ५८:४२ अशी राहिली. यावरुन महिला दर्शकही वाढत असल्याचे स्पष्ट होते. 
 
या संदर्भातील ही महत्वाची आकडे वारी –
१) थेट दर्शक –
हंगाम १: ३१ दशलक्ष
हंगाम २: ९२ दशलक्ष
वाढ: १९६%
 
२) व्यग्रता – 
हंगाम १: ०.८५ दशलक्ष
हंगाम २: ५.१ दशलक्ष वाढ: ५००%
 
३) प्रभाव – 
हंगाम १ : ३८ दशलक्ष
हंगाम २: ३७१ दशलक्ष वाढ: ८७६%
 
४) दर्शक संख्या – हंगाम १: १२ दशलक्ष
 हंगाम २: ११३.९ वाढ: ८४९%
 
रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीगच्या दुसऱ्या पर्वास संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, कॅनडा, नेपाळ, इंडोनेशिया, इराण, कुवैत, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबियातून मोठा प्रतिसाद मिळाला. साधारण १८ ते ३० वयोगटातील चाहत्यांनी या लीगचा अनुभव घेतला. ही वाढ ४० टक्क्यांहून अधिक होती.
 
रुपे पाईम व्हॉलिबॉल लीगचे सह संस्थापक आणि बेसलाईन व्हेंचर्सचे संचालक तुहिन मिश्रा यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आमची लीग चाहत्यांना आकर्षित करेल याची आम्हाला खात्री होती. ती झाली देखिल. त्याही पेक्षा टीव्ही दर्शकांच्या संख्येत झालेली वाढ आणि समाजमाध्यमांवर मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो, असे मिश्रा यांनी सांगितले. 
 
ए२३ने पुरस्कृत केलेल्या प्राईम व्हॉलिबॉल लीगचे भारतात सोनी स्पोर्टस टेन १ (इंग्रजी), टेन ३ (हिंदी), टेन ४ (तमिळ, तेलुगु) आणि टेन २ (मल्याळम) या वाहिन्यांवरून थेट प्रसारण करण्यात आले. भारतीय उपखंडाबाहेर या लीगचे वर्ल्ड टीव्हीवरून प्रसारण करण्यात आले.