May 16, 2024

तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कोर्ट मॅजिशियन, टेनिसनट्स रॉजर, सोलारिस ईगल्स, पीवायसी अ संघांचे विजय

पुणे, 12 मार्च 2024: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलाईट गटात साखळी फेरीत कोर्ट मॅजिशियन, टेनिसनट्स रॉजर, सोलारिस ईगल्स, पीवायसी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सुनील लुल्ला, संदीप बेलुडी, अमित किंडो, रवी कोठारी, जॉय बॅनर्जी, भूषण सरदेसाई यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टेनिसनट्स रॉजर संघाने पीवायसी ड संघाचा 20-7 असा पराभव केला. सुनील बर्वे, हेमंत भोसले,जयंत पवार, सिद्धार्थ जोशी, अन्वित पाठक, निनाद वाहीकर यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर सोलारिस ईगल्स संघाने पीवायसी कसंघाचा 23-19 असा पराभव केला.

अन्य लढतीत पीवायसी अ संघाने एफसी ब संघाचा 24-05 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून जयंत कढे, प्रशांत सुतार, हिमांशू गोसावी, केदार शहा, अनुप मिंडा, ऋतू कुलकर्णी, अभिषेक ताम्हाणे, केतन धुमाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. कोर्ट मॅजिशियन्स संघाने टेनिसनट्स राफा संघावर 22-12 असा विजय मिळवला.

निकाल: साखळी फेरी: इलाईट गट:
टेनिसनट्स रॉजर वि.वि.पीवायसी ड 20-7(110 अधिक गट: कुंचूर/नितीन सावंत पराभुत वि.संजय बोथरा/रणजित पांडे 2-6; 100 अधिक गट: सुनील लुल्ला/संदीप बेलुडी वि.वि. तुषार नगरकर/अजिंक्य मुठे 6-0; 90अधिक गट: अमित किंडो/रवी कोठारी वि.वि.कल्पक पत्की/मधुर इंगळहळीकर 6-1; जॉय बॅनर्जी/भूषण सरदेसाई वि.वि.अंकुश मोघे/अभिजीत खानविलकर 6-0);

सोलारिस ईगल्स वि.वि.पीवायसी क 23-19(110 अधिक गट: सुनील बर्वे/हेमंत भोसले वि.वि.मिहीर दिवेकर/हनीफ मेमन 6-4; 100 अधिक गट: संजीव घोलप/सिद्धू भरमगोंडे पराभुत वि.चारुदत्त साठे/रोहन जमेनिस 4-6; 90 अधिक गट: जयंत पवार/सिद्धार्थ जोशी वि.वि.ध्रुव मेड/संग्राम पाटील 6-3; खुला दुहेरी गट: अन्वित पाठक/निनाद वाहीकर वि.वि.रोहित शिंदे/तन्मय चोभे 7-6(10-8);

पीवायसी अ वि.वि.एफसी ब 24-05(110अधिक गट: जयंत कढे/प्रशांत सुतार वि.वि.नितीन बिडकर/पांडुरंग पाडळे 6-2; 100 अधिक गट: हिमांशू गोसावी/केदार शहा वि.वि.महेंद्र देवकर/श्रीवर्धन सुखात्मे 6-0; 90 अधिक गट: अनुप मिंडा/ऋतू कुलकर्णी वि.वि.रोहित शेवाळे/नकुल फिरोदिया 6-0; खुला दुहेरी गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.गौरव राव/संग्राम पाटील 6-3);

कोर्ट मॅजिशियन्स वि.वि.टेनिसनट्स राफा 22-12(110 अधिक गट: जॉर्ज वर्गीस/नटराजन व्ही वि.वि.जितेंद्र जोशी/बिपिन टिके 6-0; 100 अधिक गट: गिरीश के./सुधाकर रामचंद्रन पराभुत वि.सी कुमार/राहुल भोई 4-6; 90 अधिक गट:सचिन माधव/निखिल भगत वि.वि.सुधीर पिसाळ/अतुल के 6-4; खुला दुहेरी गट: शिलादित्य बॅनर्जी/परीक्षित तांबे वि.वि.अंकित कापसे/अनिरुद्ध देवधर 6-2);