May 3, 2024

18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस संघाला विजेतेपद

पुणे, 13 मार्च, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत संदीप शांघाय(34 धावा व 4-12) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इन्फोसिस संघाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाचा 54 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.

वाघोली येथील स्पोर्ट्सएज क्रिकेट अकादमी मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना इन्फोसिस संघाने 20 षटकात 7बाद 135धावा केल्या. यात संदीप शांघाय 34, हर्षद तिडके 32, पिराजी रनपूर 22, निखिल रोकडे 20 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाचा डाव 18 षटकात सर्वबाद 81धावावर संपुष्टात आला. यात आदित्य लहाने 31, सुनील बाबर नाबाद 20 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. इन्फोसिसकडून संदीप शांघाय(4-12), हर्षद तिडके(3-16), सागर बिरदवडे(2-27) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 54 धावांनी विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या इन्फोसिस संघाला करंडक व 50,000/- रुपये, तर उपविजेत्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाला करंडक व 30,000/- रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय मालिकावीराला 5,000/- रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना प्रत्येकी 5,000/- अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अंकुर जोगळेकरचे वडील विंग कमांडर उदय जोगळेकर, विजय जोगळेकर, अंजली जोगळेकर आणि पीडीसीएचे माजी उपाध्यक्ष मकरंद भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: अंतिम फेरी:
इन्फोसिस: 20 षटकात 7बाद 135धावा(संदीप शांघाय 34(39,2×4,2×6), हर्षद तिडके 32(21,5×4), पिराजी रनपूर 22, निखिल रोकडे 20, पूरब गजिनकर 2-16, सुनील बाबर 2-19, सागर दुबे 1-19) वि.वि.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 18 षटकात सर्वबाद 81धावा(आदित्य लहाने 31(29,2×4,2×6), सुनील बाबर नाबाद 20, संदीप शांघाय 4-12, हर्षद तिडके 3-16, सागर बिरदवडे 2-27);सामनावीर – संदीप शांघाय; इन्फोसिस संघ 54 धावांनी विजयी.

इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: साईनाथ शिंदे(159धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: संदीप संघाय (14विकेट)
मालिकावीर: संदीप संघाय(127धावा व 14विकेट).