May 16, 2024

35000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत दलिला जाकुपोविक हिला दुहेरी मुकुटाची संधी

नागपूर, 9 मार्च, 2024: नागपुर डिस्ट्रिक्ट हार्ड कोर्ट टेनिस असोसिएशन(एनडीएचटीए) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 35000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत स्लोव्हाकियाच्या दलिला जाकुपोविक हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, दुहेरीत रशियाच्या इरिना मारिया बारा व स्लोव्हाकियाच्या दलिला जाकुपोविक यांनी विजेतेपद संपादन केले.

रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस सेंटर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत कोरियाच्या येवानवू कु हीने रशियाच्या डारिया कुडाशोवा 6-2, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात स्लोव्हाकियाच्या दुसऱ्या मानांकित दलिला जाकुपोविकने कोरियाच्या डेयॉन बॅकचा 6-4, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित रशियाच्या इरिना मारिया बारा व स्लोव्हाकियाच्या दलिला जाकुपोविक यांनी कोरियाच्या येवानवू कु व लिथुनियाच्या जस्टिना मिकुलस्कीट या चौथ्या मानांकित जोडीचा 6-7(8), 7-6(5), 10-7 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. स्पर्धेतील दुहेरीत विजेत्या जोडीला करंडक,35डब्लूटीए गुण व 3935डॉलर, तर उपविजेत्या जोडीला करंडक, 23डब्लूटीए गुण व 2106डॉलर अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाऊर्जाच्या डिव्हिजनल मॅनेजर मृणालिनी टाळकेवार, बाजीप्रभू नगरच्या माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एनडीएचटीएचे अध्यक्ष कुमार काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक डॉ. सुधीर भिवापूरकर, एनडीएचटीएचे उपाध्यक्ष अशोक भिवापूरकर, एनडीएचटीएचे सहसचिव विक्रम नायडू आणि विजय नायडू आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी:
येवानवू कु(कोरिया)वि.वि.डारिया कुडाशोवा(रशिया) 6-2, 7-5;
दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया)[2]वि.वि.डेयॉन बॅक(कोरिया)6-4, 6-3;

दुहेरी: अंतिम फेरी:
इरिना मारिया बारा(रशिया) / दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया) [1]वि.वि. येवानवू कु(कोरिया)[4] /जस्टिना मिकुलस्कीट(लिथुनिया)6-7(8), 7-6(5), 10-7;