May 16, 2024

19व्या आंतर युनिट पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड(पीएसपीबी) बिलियर्ड्स अँड स्नूकर स्पर्धेत सांघिक बिलियर्ड्समध्ये ओएनजीसी संघाला विजेतेपद

पुणे, 8 मार्च 2024: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या वतीने आयोजित 19व्या आंतर युनिट पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड(पीएसपीबी) बिलियर्ड्स अँड स्नूकर स्पर्धेत प्रोफेशनल गटात सांघिक बिलियर्ड्समध्ये ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन(ओएनजीसी) संघाने विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना व  डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रोफेशनल गटात अंतिम फेरीत सांघिक बिलियर्ड्समध्ये
ओएनजीसी संघाने बीपीसीएल संघाचा 400-200 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पहिल्या सामन्यात ओएनजीसीच्या ध्रुव सितवालाने बीपीसीएलच्या इशप्रीत सिंग चड्ढाचा 200-115 असा तर, दुसऱ्या सामन्यात ओएनजीसीच्या सौरव कोठारीने मनन चंद्राचा 200-85 असा पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ध्वज हरिया, आरिफ अख्तर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर आयओसीएल संघाने जीएआयएल संघाचा400-136 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
वैयक्तिक स्नुकरमध्ये उपांत्य फेरीत बीपीसीएलच्या
इशप्रीत सिंग चड्ढा याने बीपीसीएलच्या एस.श्रीकृष्णाचा 3-0(99(30)-37, 64(45)-09, 96(89)-00) असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरी गाठली. आयओसीएलच्या आदित्य मेहताने आयओसीएलच्या ब्रिजेश दमानीचा 3-0(76-69(69), 76-40, 65(64)-45) असा पराभव अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
हौशी गटात वैयक्तिक स्नूकरमध्ये पहिल्या फेरीत ऑइल इंडियाच्या अरुण राव व तोलन बरुआ, एनआरएलच्या दुरलोव बोरा, एमआरपीएलच्या लोहित बंगेरा यांनी आगेकूच केली.
निकाल: वैयक्तिक स्नूकर: प्रोफेशनल गट: उपांत्य फेरी:
इशप्रीत सिंग चड्ढा (बीपीसीएल)वि.वि.एस.श्रीकृष्णा(बीपीसीएल)3-0(99(30)-37, 64(45)-09, 96(89)-00);
आदित्य मेहता(आयओसीएल)वि.वि.ब्रिजेश दमानी (आयओसीएल)3-0(76-69(69), 76-40, 65(64)-45);
सांघिक बिलियर्ड्स गट: उपांत्य फेरी:
बीपीसीएल वि.वि.आयओसीएल 400-381
(एस. श्रीकृष्ण वि.वि. ब्रिजेश दमानी 200(191)-00; इशप्रीत सिंग चड्ढा वि.वि.धवज हरिया 69-200(87,81); शाहबाज खान वि.वि.आदित्य मेहता 131-181);
ओएनजीसी वि.वि.ऑइल इंडिया 400-51(ध्रुव सितवाला वि.वि.परेश करमरकर 200(99)-23; सौरव कोठारी वि.वि.तोलन बरुआ 200(157)-28);
अंतिम फेरी:
ओएनजीसी वि.वि.बीपीसीएल 400-200 (ध्रुव सितवाला वि.वि.इशप्रीत सिंग चड्ढा 200-115, सौरव कोठारी वि.वि.मनन चंद्रा 200-85);
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत: आयओसीएल वि.वि.जीएआयएल 400-136(ध्वज हरिया वि.वि.परेश करमरकर 200(78,39)-10; आरिफ अख्तर वि.वि.तोलन बरुआ 200-126);
हौशी गट: वैयक्तिक स्नूकर: पहिली फेरी:
अरुण राव (ऑइल इंडिया)वि.वि.सुरेंदर सहारन 2-0(54-10, 36-10);
 दुरलोव बोरा(एनआरएल)वि.वि.सौरव डे(जीएआयएल) 2-0(51-15, 59-27);
तोलन बरुआ (ऑइल इंडिया)वि.वि.जयप्रकाश शेट्टी (एमआरपीएल) 2-0(32-28, 32-25);
लोहित बंगेरा (एमआरपीएल)वि.वि.विपिन वसावा(जीएआयएल) 2-0 (60-25, 57-27);