May 11, 2024

40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकतेरिना मकारोवा, मोयुका उचिजिमा,मिसाकी मत्सुदा, डायना मार्सिचेविका यांची आगेकुच

नवी मुंबई, 29 डिसेंबर, 2023: नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत एकतेरिना मकारोवा, मोयुका उचिजिमा,मिसाकी मत्सुदा, डायना मार्सिचेविका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

वाशी येथील गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या अव्वल मानांकित एकतेरिना मकारोवा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत जपानच्या साकी इमामुराचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(5), 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या मानांकित जपानच्या मोयुका उचिजिमाने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या नाहो सातोचे आव्हान 6-1, 6-1 असे सहज मोडीत काढले. जपानच्या मिसाकी मत्सुदाने रशियाच्या एकतेरिना याशिनाचा 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. सहाव्या मानांकित लात्वियाच्या डायना मार्सिचेविकाने डारिया कुडाशोवाचा 6-1, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

दुहेरीत उपांत्य फेरीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीने लात्वियाच्या डायना मार्सिचेविका व ग्रीसच्या सॅपफो साकेलारिडी या दुसऱ्या मानांकित जोडीचा 7-6(6), 7-6(1) असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात लात्वियाच्या कॅमिला बारटन व रशियाच्या एकतेरिना मकारोवा यांनी जपानच्या हिरोमी आबे व साकी इमामुरा यांचा 4-6, 6-1, 11-9 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: एकेरी:
एकतेरिना मकारोवा(रशिया)[1] वि.वि.साकी इमामुरा(जपान) 4-6, 7-6(5), 6-1;
मोयुका उचिजिमा(जपान)[2]वि.वि.नाहो सातो (जपान) 6-1, 6-1;
मिसाकी मत्सुदा (जपान)वि.वि.एकतेरिना याशिना (रशिया)6-3, 6-3;
डायना मार्सिचेविका (लात्विया)[6]वि.वि.डारिया कुडाशोवा 6-1, 7-5;

दुहेरी: उपांत्य फेरी:
कॅमिला बारटन(लात्विया)/एकतेरिना मकारोवा(रशिया)वि.वि. हिरोमी आबे (जपान)/साकी इमामुरा(जपान)4-6, 6-1, 11-9;
फुना कोजाकी (जपान)/मिसाकी मात्सुदा(जपान)वि.वि. डायना मार्सिचेविका(लात्विया)[2] /सॅपफो साकेलारिडी (ग्रीस)7-6(6), 7-6(1).