बारामती, दि. ५ जुलै, २०२३- विविध वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या सासवड विभागामार्फत पुरंदर तालुक्यात आजपासून ‘एक गाव, एक दिवस’ ही योजना युद्धपातळीवर राबविली जात आहे. त्यासाठी महावितरणकडून दि. ५ जुलै ते २६ ऑगस्ट कालावधीचे ११५ गावांचे गावनिहाय वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमांतून महावितरण पुरंदर तालुक्यातील सर्व वीज समस्या सोडविणार आहे.
दोन दिवसांपासून आमदार संजय जगताप यांचे सासवड येथे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाची महावितरणने गंभीर दखल घेतली असून, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पुरंदर तालुक्यातील सर्व वीज समस्या सोडविण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे सांगितले आहे.
५ जुलै रोजी सासवड शहर व जेजुरी शहरापासून या योजनेची सुरुवात केली आहे. पुढील ५३ दिवस हा कार्यक्रम राबविला जाणार असून दररोज किमान दोन गावे याप्रमाणे ११५ गावे वीज समस्यांमुक्त करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. या योजनेतून नवीन वीज जोडण्या तात्काळ देणे, वीजबिल तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे, नादुरुस्त वीज मीटर तात्काळ बदलणे, उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल उभारणे, लूज गाळ्यांना ताण देणे, वीज रोहित्रांची व रोहित्र पेट्यांची दुरुस्ती करणे, त्याचे केबल बदलणे यांसह ग्राहकांच्या विविध तक्रारींचे जागेवर निराकरण आदी कामे केली जाणार आहेत. याकामांमुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
More Stories
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत
औरंगजेबाची कबर हटवयन्याची विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी ः अनयथा राज्यव्यापी ‘क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव’ आंदोलनचा इशारा