May 19, 2024

पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा दीड तास नव्हे, केवळ २१ मिनिटे बंद: महावितरण पुणे

पुणेदि. ४ जुलै २०२३: पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा सोमवारी (दि. ३) सकाळी दीड तास नव्हे तर पक्षी वीजतारेला चिटकून मृत झाल्यामुळे केवळ २१ मिनिटे बंद राहिला असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा दीड तास बंद असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यासंदर्भात महावितरणकडून खंडन करण्यात आले आहे. पर्वती जलकेंद्राला २२ केव्ही एक्सप्रेस वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. सोमवारी जलकेंद्राच्या प्रांगणातील उपरी वीजवाहिनीच्या तारांना एक पक्षी चिटकून मृत झाल्याने सकाळी ८.०४ वाजता वीजपुरवठा बंद पडला. त्यानंतर ताबडतोब बिघाड शोधून सकाळी ८.२५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

जलकेंद्राच्या प्रांगणात उपरी वीजवाहिन्यांजवळ झाडांच्या मोठ्या फांद्या आहेत. त्यावर विविध पक्ष्यांचा मोठा संचार आहे. या झाडांच्या काही फांद्याची छटाई आवश्यक असल्याचे यापूर्वीच महावितरणकडून जलकेंद्राला कळविण्यात आले आहे.