May 20, 2024

35000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्लीचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

नागपूर, 6 मार्च, 2024: नागपुर डिस्ट्रिक्ट हार्ड कोर्ट टेनिस असोसिएशन(एनडीएचटीए) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 35000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस सेंटर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत भारताच्या पाचव्या मानांकित सहजा यमलापल्ली हीने भारताच्या वैदेही चौधरीचा 3-6, 6-1, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. अव्वल मानांकित रशियाच्या इरिना मारिया बाराने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या आकांक्षा नित्तूरेचा 6-1, 6-3 असा सहज पराभव केला.

रशियाच्या एनास्तेसिया झोलोटारेवाने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीचा 6-3, 1-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. जपानच्या अयुमी कोशिशीने लात्वियाच्या चौथ्या मानांकित डायना मार्सिचेविकाचा 6-4, 7-6(6)असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. जपानच्या क्वालिफायर इकुमी यामाझाकीने भारताच्या क्वालिफायर वैष्णवी आडकरचे आव्हान 3-6, 6-4, 6-3 असे मोडीत काढले. जपानच्या बिगर मानांकित मेई यामागुचीने तिसऱ्या मानांकित लिथुआनियाच्या जस्टिना मिकुलस्कीटचा 7-5, 6-2 असा पराभव सनसनाटी निकाल नोंदवला. कोरियाच्या डेयॉन बॅकने भारताच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अंजली राठीचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. कोरियाच्या येवानवू कुने फ्रान्सच्या यास्मिन मन्सुरीला 7-5, 3-6, 6-0 असे पराभुत केले.

निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी:
इरिना मारिया बारा (रशिया)[1]वि.वि.आकांक्षा नित्तूरे(भारत)6-1, 6-3;
सहजा यमलापल्ली(भारत)[5]वि.वि.वैदेही चौधरी(भारत)3-6, 6-1, 6-1;
एनास्तेसिया झोलोटारेवा(रशिया) वि.वि.श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)6-3, 1-6, 6-4;
अयुमी कोशिशी(जपान)वि.वि.डायना मार्सिचेविका(लात्विया)[4]6-4, 7-6(6);
इकुमी यामाझाकी(जपान)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)3-6, 6-4, 6-3;
मेई यामागुची (जपान)वि.वि.जस्टिना मिकुलस्कीट(लिथुआनिया)[3]7-5, 6-2;
डेयॉन बॅक(कोरिया)वि.वि.अंजली राठी (भारत)6-1, 6-1;
येवानवू कु(कोरिया)वि.वि.यास्मिन मन्सुरी(फ्रांस)7-5, 3-6, 6-0;

दुहेरी: पहिली फेरी:
थासापोर्न नाकलो (थायलंड)/अकिको ओमाय(जपान)वि.वि. झील देसाई (भारत)/स्नेहल माने (भारत)6-1, 7-6(5);
इरिना मारिया बारा(रशिया) / दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया) [1]वि.वि. हुमेरा बहरामूस(भारत)/ पूजा इंगळे (भारत)6-1, 6-2;
मिरियाना टोना(इटली)/ सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.शर्मदा बाळू (भारत) / रिनॉन ओकुवाकी(जपान) 7-5, 4-6, 10-8;
फॅनी ऑस्टलंड(स्वित्झर्लंड)[2] /एकटतेरिना याशिना(रशिया)वि.वि.अयुमी कोशिशी(जपान)/ मिचिका ओझेकी(जपान)7-5, 7-6(3)