पुणे, 02/03/2023: प्रेम हिच खरी भारताची शिकवण आहे आणि हाच खरा भगवान गौतम बुद्धांनी दिलेला विचार जगाला समृद्ध करेल असे मत ज्येष्ठ अभ्यासक व दिल्ली चे माजी सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी आळंदी येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय बौद्ध विचार अधिवेशनात व्यक्त केले .
पुढे ते म्हणाले की ,जर आपण सदाचारी मार्गाचा अवलंब केला तरच ते जगासाठी कल्याणकारी असेल. वैज्ञानिक दृष्टीकोनाला बौध्दात महत्त्वाचे स्थान आहे. व्देष फक्त व्देषालाच जन्म देतो. त्यामुळे दुसऱ्यांप्रती प्रेमच बाळगले पाहिजे. जेव्हा लोक प्रेमाने राहतील, तेव्हा भारत बौध्दमय होईल. ज्ञानावर आधारीत असलेली बौध्द विचारसरणी मानवजातीचे कल्याण करेल. स्वत:ची जात सांगून दुसऱ्यांची जात माहिती करून घेऊ इच्छित असाल, तर तुम्ही बौध्द नाही. बौध्द कधीही जात, उच्च -निच याबाबत बोलत नाही. धम्माचे कल्याण करण्य़ासाठी व्देष संपवला पाहिजे. हिंदू मधून बौध्द होण्यासाठी 22 प्रतिज्ञा मान्य केल्या पाहिजे. कटुतेचा मार्ग सोडून प्रेमाच्या मार्गावर चालून मानवजातीचे कल्याण केले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जातीला जिवंत ठेवाल तोपर्यंत जातीच्या जाचातून मुक्त होणं शक्य नाही. त्यामुळे आधी स्वत: जात सोडा आणि समाज जोडा. बौध्द विद्यापीठांच्या निर्मितीसाठी प्रेमाचा प्रसार केला पाहिजे, तेव्हाच भारत प्रबुध्द होईल.
बुध्द विहार समन्वय समिती तर्फे 2014 पासून सुरू केलेल्या विहारांच्या समन्यव अभियानाची सुरूवात नागपूर पासून सुरुवात करण्यात आली होती.दोन वर्षे बुद्ध महोत्सव, चार बुद्ध विहार समन्वय परिषदा, राज्य अधिवेशन, पहिले राष्ट्रीय अधिवेशन हे गतवर्षी नाशिकमध्ये आणि सध्याचे व्दितीय अधिवेशन हे पुण्यातील रसिकलाल धारिवाल संकूल, आळंदी येथे शनिवार- रविवार दि.25 आणि 26 फेब्रुवारी,2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. दिल्ली राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुणाचल प्रदेशचे भन्ते डोंडुप त्सेरिंग प्रमुख अतिथी होते. पुण्याचे धम्मचारी ज्ञानराजा,बेंगलोरचे मारीस्वामी, महाराष्ट्र साताराचे पद्मश्री लक्ष्मण माने अतिथी होते .या सर्वांनी समयोचित मार्गदर्शन केले.
अधिवेशनाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक अध्यक्षीय भाषणातून आचार्य नंदकिशोर साळवे यांनी सर्व धम्म संघानी एक सामायिक कार्यक्रमावर एकत्र येण्याचे जोरदार समर्थन केले. त्यांनी समाजाचे कल्याण होईल असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक भाषण गजानन पडघण यांनी आणि आर. आर. धनविजय यांनी आभार प्रदर्शन केले.
जयाजी पाईकराव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चा सत्रात दिल्लीचे सुधीर राज सिंह यांनी भारतात बुध्दाचा समन संघ निमार्ण करणे, मुंबईचे प्रा. डॉ.डेकाटे यांनी बुद्धिस्ट पर्सनल लॉ निर्मिती या विषयावर, दिल्लीचे सुप्रीम कोर्टाचे वकील ऍड. अभिषेक राज सिंह यांनी 22 प्रतिज्ञा आणि त्यांचे कायदेशीर अधिष्ठान या विषयावर,डॉ. पंचशीला दुर्गे यांनी “बौद्ध समाजाची शिखर संस्था निर्मिती”,महेंद्र बुद्धरत्न “बुद्ध विहारोंका संकलन”,प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा यांनी “जन जागृतीची आवश्यकता”, बबन चहांदे यांनी “बौद्ध गया महाबोधी महाविहार की मुक्ती “, डॉ. प्रफुल्ल गडपाल यांनी “पाली भाषा प्रसार की आवश्यकता”,या विषयांवर मार्गदर्शन केले.प्रा. घनश्याम धाबर्डे यांनी प्रास्ताविक आणि संचालन अशोक सरस्वती बौद्ध यांनी केले.
युवा युवतीचे चर्चा सत्र चेन्नईचे डॉ. भारती प्रभू यांचे अध्यक्षते खाली “बुद्ध विहारा पासून युवकांची अपेक्षा आणि त्यांचे कर्तव्य “या विषयावर झाले. बेंगलोरच्या ऍड. मृदुला वनंगामुडी, बिहारचे भन्ते विमलकीर्ती,गोव्याचे मिलिंद माटे, महाराष्ट्रचे प्रतिमा पडघण,ऍड. कविता वामन या विषयावर मार्गदर्शन केले .प्रास्ताविक अण्णा बनसोडे, संचालन सुधीर चालखुरे, आभार प्रदर्शन तनुजा बौद्ध यांनी केले.
देशातील अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी वर्गाला धम्म चळवळीत सहभागी करून घेणे, मुलांना धम्म दीक्षा देणे, बौद्ध तत्वज्ञान आणि आंबेडकरवादाचा प्रचार आणि प्रसार करणे, पाली भाषेचे संवर्धन करणे, बौध्दाचे हॉस्पिटल उभारणे, विहारांमध्ये मंगलमय कार्य पार पडेल अशी व्यवस्था तयार करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अनाथपिंडक पुरस्कार, स्थानिक संस्थात्मक पुरस्कार आणि नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये पुण्यातील अॅ्ड. सी. आर. सांगलीकर, सुरेश कजबे, नागपूरचे नरेंद्र बावनगडे, बंगळूरुमधील मारीस्वामी आदींना अनाथपिंडक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.स्थानिक संस्थात्मक पुरस्कार बोधिसत्त्व सहकारी हॉस्पिटल, अर्थदीप नागरी सहकारी पत संस्था, बौध्द विकास समिती , या संस्थांना प्रदान करण्यात आला. ए. के पाटील, धेनुत्तम बांबोर्डे, प्रा. आनंद वासनिक, गौतम मोडक, चंद्रशेखर शेंडे,अविनाश कठाणे, दिलीप बागडे, बिड चे प्रकाश सिंग तुसाम, यांना नागरी सन्मान करून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या दोन दिवसात रवींद्र सोनबावणे यांचे धम्म गीत गायन अशोक सरस्वती बौद्ध यांचे आंबेडकरी कीर्तन,शाहिर उत्तम इंगोले यांचे कला पथक ,संथागार फाउंडेशन गोंदिय च्या महिला शाखेने 2.30 तासाचे दोन अंकी रमाई नाटक,समन संघ नागपूर तर्फे संविधान जागर, संभाजी गायकवाड आणि संच यांनी “मी महात्मा फुले बोलतोय “ही एकपात्री नाटिका इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेत.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरूवात ही भदन्त यश कश्यपायन, शीलरक्षीत महाथेरो, धम्मदीप महाथेरो, विमल कीर्ती भन्ते बिहार, कुशल धम्मो सुंथरो आणि भिक्षुनी यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध वंदनेने झाली.
प्रतिनिधी सत्राच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महासचिव प्रा. उमेश पठारे हे होते. या सत्रात महाराष्ट्राचे महेंद्र बुध्दरत्न, गोव्याचे डॉ. उल्हास आंबेडकर, राजस्थानचे कैलासचंद खाडीया, छत्तीसगडचे ओमप्रकाश चौधरी, मध्य प्रदेशाचे प्रा. बी. के. खातरकर, दिल्ली चे प्रकाश जांभुळकर,तामिळनाडूचे जी. मोहन, सुब्रमणी, कर्नाटकच्या मृदुला वनंगमुडी,गोव्याचे डॉ. उल्हास आंबेडकर,विदर्भातून त्र्यंबक ढोके, अविनाश कठाणे,उत्तर महाराष्ट्र जी. बी. पवार, ऍड. प्रदीप गोसावी,, कोकण -अशोक
पंडागडे,पश्चिम महाराष्ट्र- प्रा. शशिकांत टिकोटे, आनंद राणे,संभाजी गायकवाड,महिला प्रतिनिधी प्रमिला सोनवणे,मराठवाडा डॉ. संजय गवई, प्रकाश सिंह तुसाम, प्रशांत वाघमारे,
यांनी सहभाग घेतला होता.
दुपारच्या चर्चासत्रात मेहराताई गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली धम्म महासागर सबकी एकरुपता या विषयावर चर्चा झाली. यात डॉ. भदन्त यश कश्यपायन, बेंगलोरच्या एस. नित्या, डॉ. रमेश राठोड, भन्ते धम्मदीप, पुण्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक रतनलाल सोनाग्रा आदींनी सहभाग घेतला होता.
अधिवेशनाचे समापन कार्यक्रमात पाच ठराव पारित करण्यात आले. तसेच गजानन पडघन यांनी सहकारी वृंद बंधु भगिनींचे ऋण व्यक्त केले.
देशाच्या कानाकोपऱ्यातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली होती..
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.