July 24, 2024

पुणे: मुंढवा वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

 पुणे दि. ०२/०३/२०२३: पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता ए.बी. सी. फार्म चौक ते ताडीगुत्ता मार्गे जहांगीर नगर व ए.बी.सी. फार्म चौक ते ताडीगुत्ता मार्गे केशवनगर या मार्गावरील सकाळी  ७.०० ते ११.०० व सायंकाळी १७.०० ते २१.०० या वेळेत जड वाहनास बंदी करण्यात येणार आहे.

वाहतूक बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १२ मार्च पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.

नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे  उप आयुक्त वाहतूक पुणे शहर यांनी कळविले आहे.