May 18, 2024

खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ रोड सायकल स्पर्धेचे आयोजन

पुणे, १८ ऑक्टोबर २०२३: क्रीडा स्पर्धामधील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या केवळ महिला/मुलींसाठी असलेल्या ‘वुमेन्सचे लीग’ योजने अंतर्गत सायकल स्पर्धेचे आयोजन सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने केले आहे. हि स्पर्धा महाराष्ट्रामध्ये बारामती, ता. बारामती, जिल्हा – पुणे येथे दिनांक २१ आणि २२ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे संघटन सचिव सचिव प्रताप जाधव, यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या/मुलींच्या क्रीडा गुणांना वाव देणे, स्पर्धांचा सराव होणे आणि त्यामधून गुणवान महिला/मुली खळाडूंची निवड करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. प्रथम विभागीय स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सायकलिंग खेळाच्या ‘वुमेन्सचे लीग’ स्पर्धा रोड आणि ट्रॅक प्रकारात होणार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार विभागात या स्पर्धा होतील.
पश्चिम विभागाची रोड प्रकारामधील पहिली स्पर्धा महाराष्ट्रामध्ये बारामती, ता. बारामती, जिल्हा – पुणे येथे दिनांक २१ आणि २२ ऑक्टोबर २०२३ रोजी बारामती शहरामधून भिगवनला जाताना ३ कि.मी. अंतरावर पाटस ते लिमटेक गावादरम्यान नवीन तयार होत असलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी ११:४५ ते १:०० दरम्यान शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिलाताई पवार यांच्या हस्ते स्पर्धे ठिकाणी होईल.
या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेच्या तांत्रिक संचालिका आणि राष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांनी सांगितले की या स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनीअर अशा वयोगटात होतील. स्पर्धेसाठी कोणत्याही बनावटीची सायकल चालणार आहे. स्पर्धा टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट या प्रकारात होतील. तसेच सब जुनिअर वयोगटात केवळ भारतीय बनावटीच्या सायकलची स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमधील विजेत्यांना एकूण १ लाख २० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. याप्रसंगी शिवछत्रपती पारोतोषिक सन्मानीत आणि स्पर्धेच्या मुख्य पंच मिनाक्षी शिंदे, मिलींद झोडगे, बिरु भोजने आदी मान्यवर हजर होते.