May 18, 2024

‘आर्या – डॉटर ऑफ भारत’ या मराठी चित्रपटाचा सिंगापूरमधील वर्ल्ड फिल्म कार्निव्हल मध्ये सन्मान

पुणे, दि. १९ ऑक्टोबर, २०२३ : पुण्याचे नितीन भास्कर दिग्दर्शित आणि शरद पाटील निर्मित ‘आर्या – डॉटर ऑफ भारत’ या मराठी चित्रपटाचा सिंगापूर येथील वर्ल्ड फिल्म कार्निव्हलमध्ये नुकताच नरेटिव्ह फीचर्स ऑनरेबल मेंशन अॅवॉर्डने सन्मान करण्यात आला आहे. नुकतेच प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नॉर्वेच्या बॉलिवूड फेस्टिव्हलमध्ये देखील चित्रपटाचे प्रदर्शन झाले होते. हा नॉर्वेच्या बॉलिवूड फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणारा एकमेव मराठी चित्रपट होता हे विशेष.

आधुनिक शहरी इंडिया आणि पारंपारिक ग्रामीण भारत यांचे दर्शन आपल्याला आर्या या चित्रपटात होते. आर्या व तिच्या पालकांची गोष्ट चित्रपटात चितारण्यात आली असून संस्कृती, तंत्रज्ञान आणि विचारधारा यांमध्ये असलेला फरक अधोरेखित करण्यात आला आहे. या सर्वांमधून आर्या कशा प्रकारे बंधने झुगारत स्वत:च्या अटींवर आपल्या स्वप्नांना गवसणी घालते हा प्रवास दाखविण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपलाकडे अत्याधुनिक इंडिया आणि ग्रामीण भारत हे भाग आहेत असे मला कायमच जाणवायचं. याच विचारांवर ‘आर्या’ हा चित्रपट बेतलेला आहे. जगाने माझ्या दृष्टीतून आणि विचाराने या विषयाकडे पहावे अशी भावना दिग्दर्शक नितीन भास्कर यांनी व्यक्त केली.

चित्रपटाची कथा, संवाद आणि गीत लेखन – डॉ प्रकाश डॉ. प्रकाश पर्येंकर, पटकथा लेखन – डॉ. प्रकाश डॉ. प्रकाश पर्येंकर, श्रीकांत भिडे, मुख्य सहाय्यक दिग्दर्शक – सागर राठोड, प्रॉडक्शन मॅनेजर – अमोल लांडगे, कला दिग्दर्शक – नितीन बोरकर, कार्यकारी निर्माता – विजयकुमार मगरे, नेपथ्य- विशाखा शिंदे, ड्रेस – योगिता पाटील, चित्रपट संपादन – स्मिता फडके, डीआय कलरिस्ट – विनोद राजे, संगीत – रोहित नागभिडे; व्हीएफएक्स पर्यवेक्षक – आत्माराम सावंत, सिद्धार्थ तोरी, साउंड डिझाईन आणि मिक्सिंग इंजिनिअर – धनंजय साठे, सिनेमॅटोग्राफी- एस समीर, निर्माते शरद पाटील, अंजली पाटील, दिग्दर्शक – नितीन भास्कर, फेस्टिव्हल क्युरेटर मयूर बोरकर