May 3, 2024

भाजपातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रभक्तीचा जागर!

पिंपरी, १३/०८/२०२३: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात येत आहे. तिरंगा बाईक रॅली, क्रांतिकारकांचा जिवंत देखावा, देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभिभानांतर्गत वाल्हेकरवाडी येथे देशभक्तीपर गीते, क्रांतीकारकांचा जिवंत देखावा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी चौक येथे होऊन वाल्हेकरवाडी मार्गे सायली कॅाम्प्लेक्स मार्गी ममता स्वीट – स्पाईन रोड येशे समारोप झाला. यावेळी माजी सभापती स्थायी समिती विलास मडगिरी, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिचंवडे, माजी नगरसेवक राजेद्र गावडे, सुरेश भोईर, अभिषेक बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, चिंचवड किवळे मंडलध्यक्ष योगेश चिंचवडे, माजी स्विकृत सदस्य बिभीषण चौधरी, शहर उपाध्यक्ष भाजपा शेखर चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे, जिल्हा कार्यकरणी सदस्य रविंद्र देशपांडे, विनोद मालु, चिंचवड किवळे मंडल युवा मोर्चा अध्यक्ष सन्नी बारणे, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस प्रसाद कस्पटे, चिंचवड किवळे मंडल सरचिटणीस रविंद्र प्रभुणे, व्यापारी आघाडी शहरध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, दीपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे, तसेच महिला मोर्चा शहरध्यक्ष उज्वला गावडे, चिंचवड किवळे मंडल महीला मोर्चा अध्यक्ष पल्लवी वाल्हेकर, चिंचवड किवळे मंडल उपाध्यक्ष नूतन चव्हाण कविता पंढरीनाथ दळवी, निता कुशारे, दिपाली कलापुरे, पल्लवी मारकड, निशीगंधा वाल्हेकर, सचिन शिवले, खंडुदेव कटाके, अशोक वाळुंज, दीपक वाल्हेकर, कमलाकर गोसावी आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या प्रमणात उपस्थित होते.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बाईक रॅली, प्रभातफेरी, पदयात्रा, विविध स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या निमित्त पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.

आपल्या राष्ट्राप्रती त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे भारतीय तिरंगा आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याशी वैयक्तिक संबंधाचेच नव्हे, तर राष्ट्र उभारणीसाठी आपली वचनबद्धता आहे, ही भावना भारतीय नागरिकांमध्ये जागृत करणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे. हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन भारताला एक मजबूत आणि समृद्ध देश बनवण्यासाठी कटिबद्ध होवूया, असे आवाहन मी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना करतो. वाल्हेकरवाडीतील क्रांतिकारकांच्या जिवंत देखाव्यामुळे धगधगत्या क्रांतिपर्वाचे स्मरण झाले. – शंकर जगताप, शहराध्यक्ष- भाजपा, पिंपरी चिंचवड शहर