पुणे, 28 एप्रिल 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीएमडीटीए मानांकन – ओडीएमटी नटराज टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नटराज टेनिस अकादमी, कर्वे रोड या ठिकाणी 29 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 110 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी अभिनव जगताप यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक उमेश दळवी यांनी सांगितले.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान