December 14, 2024

पुणे: विवाह नोंदणी संकेतस्थळावरील ओळखीतून, तरुणीची साडेसहा लाखांची फसवणूक

पुणे, ०४/०७/२०२३: विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीची सहा लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी नाशिकमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभिजीत प्रकाश भालेराव (वय २८, रा. अशोकनगर, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी भालेराव यांची एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली होती. भालेरावने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून तरुणी आणि तिच्या आईकडून पैसे उकळले.

चुलतभावाचा अपघात झाला आहे. बहिणीला रुग्णालात दाखल करण्यात आले आहे , अशी कारणे सांगून त्याने वेळोवेळी तरुणी अआि तिच्या आईकडून वेळोवेळी सहा लाख ६६ हजार रुपये उकळले. भालेरावने वडील आणि बहिणीच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करुन घेतले. तरुणीला संशय आला. तिने भालेरावकडे पैसे मागितले. त्यानंतर त्याने तरुणीला काही रक्कम परत केली. उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत.