April 27, 2024

पुणे: वानवडीतील सोनसाखळी हिसकाविणार्‍या टोळीविरुद्ध मोक्का, सराईत चव्हाण टोळीविरुद्ध ४७ वी कारवाई

पुणे, दि. १३/०८/२०२३: शहरातील विविध भागात दहशत माजविणार्‍या सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे सराईत टोळ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वानवडी परिसरात महिलांचे दागिने हिसकाविणार्‍या सराईत ज्ञानेश्वर चव्हाण टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याfिवरूध्द १६ गुन्हे दाखल असुन दोन्ही आरोपीनी ८ गुन्हे केले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही ४७ वी कारवाई आहे .

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय २२ रा. देवाची उरुळी मुळगाव-खुनेश्वर, ता. मोहोळ, सोलापूर (टोळी प्रमुख ) आणि गजानन दत्तराव बोहाडे / बोराडे (वय ३० रा. हिवरकर मळा, सासवड, ता. पुरंदर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

महिलेच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना ८ जूनला वानवडीतील केदारी गार्डन परिसरात घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्हा सराईत ज्ञानेश्वर चव्हाण याच्यासह साथीदाराने केल्याचे उघडकीस आले. त्याच्याfिवरूध्द १६ गुन्हे दाखल असुन दोन्ही आरोपीनी एकत्रीत ८ गुन्हे केले आहेत. टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी केली.

एकट्या महिलांना गाठून करीत होते लुटमार
सराईत आरोपी एकटया महिलांना गाठुन त्यांना धक्का देउन सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन जबरदस्तीने चोरी करीत होते. महिलांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य करीत होते. स्वतःचे अस्तीत्व लपविण्यासाठी वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव करीत दुचाकींचा वापर केला आहे. दोघांनी शहरातील विविध भागात जबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे एकत्रीत गुन्हे केल आहेत.