पुणे, २३/०२/२०२३: शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिषाने बारा ते पंधरा लाख अशा स्वरूपात रकमा घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकनात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात 44 जणांची फसवणूक केल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे.
याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे शिक्षक असून त्यांच्या त्यांच्या नात्याने एक महिलांना शिक्षक पदावर नोकरी हवी होती. जून 2019 मध्ये दादासाहेब दराडे हे त्यांच्या संपर्कात आले त्याने शैलजा दराडे ह्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगितले. सूर्याच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसर येथे 12 आणि 15 लाख असे 27 लाख रुपये घेतले. परंतु नोकरी न लावल्याने फिर्यादीने पैसे मागितले तरीही त्यांनी पैसे परत केले नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्य 44 लोकांची देखील फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
More Stories
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत
औरंगजेबाची कबर हटवयन्याची विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी ः अनयथा राज्यव्यापी ‘क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव’ आंदोलनचा इशारा