December 14, 2024

पुणे: फेडरल बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज शुक्रवारी वाकडेवाडी येथे धरणे आंदोलन झाले

पुणे, दि -30 जून 2023: फेडरल बँकेत नोकरभरती करा बँक व्यवस्थापनाने युनियनबरोबर केलेला वेतनवाढ व अन्य मागणंविषयीचा कराराची तातडीने अमलबजावणी करावी, कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करा ,बँक ग्राहकांना विमा पॉलिसी घेणे रद्द करा, बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस व्यवस्थित द्या आदी मागण्यासाठी फेडरल बँक एम्प्लॉइज युनियन पुणे विभागातर्फे कर्मचाऱ्यांनी नरवीर तानाजी वाडी येथे फेडरल बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर 5 तास धरणे आंदोलन केले.

फेडरल बँक एम्प्लॉइज युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष विशाल ठक्कर सरचिटणीस सुजित राजू, पुणे बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष राणे, सरचिटणीस शैलेश टिळेकर, फेडरल बँक एम्प्लॉइज युनियनचे उपाध्यक्ष सुनिल नंबियार, पुणे विभागाचे अध्यक्ष सुहास सुतार, सेक्रेटरी अक्षय हगवणे, युनियनच्या सदस्यां प्रतिमा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली फेडरल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नरवीर तानाजी वाडी येथील फेडरल बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले या आंदोलनास अन्य बँकेच्या कर्मचारी युनियनने व कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला.

फेडरल बँक युनियनचे अध्यक्ष ठक्कर आपल्या भाषणात म्हणाले की, केंद्र सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे बँक व्यवस्थापणाने गंभीरपणे आमच्या मागण्यांचा विचार करावा बँकेत तातडीने लिपिक, शिपाई स्वीपर्स सफाई कामगार आदींची तातडीने भरती करावी बँकेत नवीन खाते सुरू करणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या व अन्य विमा कंपन्याच्य पॉलिसी घेण्याचे धोरण बंद करावे कंत्राटी कामगाराना व आऊट सोर्सिंग कर्मचाऱ्यांना तातडीने बँक सेवेत कायम करावे.

शैलेश टिळेकर म्हणाले की केंद्र सरकारने आमच्या मागण्याची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करावी कामगार कायद्याची कामगारांच्या हिताचे दृष्टीने अमलबजावणी करावी.

यावेळी नंबियार, सुजित राजू, सुतार आदीची भाषणे झाली.