पुणे, २२/०७/२०२३: कात्रज भागातील टोयाटो मोटार कंपनीच्या दालनातून आठ लाख ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत योगेश पवार (वय ४०, रा. गोकुळनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कात्रज बाह्यवळण मार्गावर आंबेगाव परिसरात टोयाटो मोटार कंपनीचे दालन आहे. दालन बंद असताना चोरट्यांनी खिडकीची काच सरकवून आत प्रवेश केला. रोकड ठेवण्याच्या खोलीीतून चोरट्यांनी आठ लाख ४८ हजार रुपयांची रोकड लांबविली. दालन सकाळी उघडण्यात आले. तेव्हा रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

More Stories
Pune: शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Pune: अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा- मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश
Pune: एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन