पुणे, दि. १४/०७/२०२३: कोकेन विक्रीसाठी आलेल्या परदेशी तस्कराकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १ लाख २० हजारांचे सहा ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. ही कारवाई विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
अमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के व प्रविण उत्तेकर यांना कोकेन तस्करांची माहिती मिळाली होती.
विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅप्रस ए डी एम बटालियन समोर सार्वजनिक रोडवरील परदेशी नागरिक हा ओळखीचे लोकांना कोकेन अंमली पदार्थ विक्री करीत होता. त्यानुसार पॅट्रीक अमोस ऊर्फ बोरा वय ३९. साऊथ अफ्रिका देश यांस ताब्यात घेवून त्याची झडती घेतली. त्याच्या कडून ०६ ग्रॅम कोकेन, तीन मोबाईल, दुचाकी , पासपोर्ट, ओळखपत्र, बँकपासबुक,असा ऐवज जप्त केला.
ही कामगिरी उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक . विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, नितेश जाधव, रेहाना शेख, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांनी केली.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार