May 18, 2024

पुणे: रहिवाशांच्या जीवाशी खेळ; इमारतीची अर्थिंग वायर चोरणारे अटकेत- सिंहगड रस्ता परिसरातील घटना

पुणे, १४/०७/२०२३: सिंहगड रस्त्यावरील एका इमारतीतील अर्थिग वायर चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चाेरट्यांकडून ३० हजार रुपयांची अर्थिग वायर, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रवींद्र प्रकाश देशमुख (वय ३४, मूळ रा. शाहूनगर, ता. माजलगाव, जि. बीड, सध्या रा. काळूबाई निवास, वेताळबुवा चौक, नऱ्हे), हेमराज शांताराम पाटील (वय २७, मूळ रा. बोळे, ता. पारुळा, जि. जळगाव, सध्या रा. श्री ॲव्हेन्यू बिल्डींग, नऱ्हे) यांना अटक करण्यात आली आहे. नऱ्हे भागातील एका सोसायटीच्या आवारातून अर्थिंग वायर चोरीला गेली होती. याबाबत रहिवाशांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. नवले पुलाजवळ आरोपी देशमुख, पाटील थांबले होते. दोघांनी सोसायटीच्या आवारातून अर्थिंग वायर चोरल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून अर्थिंग वायर, दुचाकी असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, शिवाजी क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.