पुणे, २६/०४/२०२३: जॉईंट वेंचर करारनाम्याचे उल्लंघन करून मिळकतीच्या करारनाम्यात फेरबदल करून जागा मालकाची बांधकाम व्यवसायिकडून १५ कोटीची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर शेषमल पोरवाल ( वय -६०) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी विकास नेमचंद छाजेड (वय -३८, रा.निगडी ,पुणे) या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार १/४/२०२३ ते १/१०/२२ या दरम्यान घडला आहे.
यातील तक्रारदार व आरोपी यांचेमध्ये झालेल्या जॉईन्ट व्हेंचर करारनाम्यानुसार १८ महिन्यांचे आतमध्ये तक्रारदार यांना ठरलेल्या प्रमाणे कोणताही मोबदला न देता, करारामध्ये ठरल्याप्रमाणे विलंबाबाबत व्याज दिले नाही. तसेच इतर जागामालक छाया पोपटलाल गांधी आणि सुरेश अशोक गांधी व अबिदा लतिफ मुलाणी यांचेकडुन तक्रारदार यांनी घेतलेल्या एकुण क्षेत्र ०५.८५ आर या मिळकतीचे नकाशे मंजुर करुन घेतले. आरोपीने त्याचे तक्रारदार यांचेकडुन रजिस्टर अधिकार न घेता, संबंधित मिळकतीच्या एफएसआयचे विकसनाकरीता असलेल्या जागेमध्ये, मंजुर बांधकाम नकाशा प्रमाणे बांधकाम न करता, स्वतःहुन प्लॅन बदलुन संपुर्ण ईमारतीमध्ये फर्निचर केले. सदरची मिळकत ही तक्रारदार यांच्या परस्पर लिव्ह इट या कंपनी बरोबर करारनामा करुन तक्रारदार यांची फसवुणक करुन तक्रारदार व आरोपी यांनी त्याठिकाणी घेतलेली इतर मिळकत ही ठरलेल्या अटि व शर्तीप्रमाणे अग्रीमेंट करुन घेणे गरजेचे असताना आरोपी यांनी आजपर्यंत त्या करीता होकर किंवा नकार देणे क्रमप्राप्त असताना सुध्दा त्याबाबत कोणताही निर्णय न देता सुमारे २५ हजार ते ३०हजार स्वेअर फुटचे बांधकाम तक्रारदार यांना करता येत नसल्याने आरोपी यांनी तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन त्या मिळकती पासुन चांगला आर्थीक फायदा होईल असे प्रलोभन दाखवले. अशाप्रकारे तक्रारदार यांची सर्व बाजुने आर्थीक नुकसान व फसवणुक करुन सुमारे १५ कोटी रुपयाची फसवणुक केली आहे.याबाबत पुढील तपास सहा्यक पोलीस निरीक्षक एस कांबळे पुढील तपास करत आहे.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन