May 2, 2024

पुणे: नरेंद्र मोदी यांना मोर्चामध्ये शिवीगाळ, भाजप युवा मोर्चाची बामसेफ विरोधात पोलिसाकडे तक्रार

पुणे, ११ ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असताना त्याच काळात बामसेफ व इतर समविचारी संघटनांनी मोर्चा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अश्लील भाषेत घोषणाबाजी केल्याने त्या विरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे फलास्काना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

पुणे शहरा मध्ये बामसेफ आणि इतर संघटनां कडून बेकायदेशीर पणे रस्त्यावर उतरून  रस्ता आडवून नागरिकांना दुकान बंद करण्या साठी सांगण्यात येत होते तसेच
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघा चे सरसंघचालक मोहन जी भागवत यांच्या विरोधात पुणे शहरा मध्ये भर रस्त्यामध्ये लाऊड स्पीकर वर शिविगाळ करून घोषणा बाजी करत होते . समाजा मध्ये तेढ़ निर्माण करणाऱ्या  या संघटने च्या १०० ते १५० समाजकंटका विरोधात भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि क़सबा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या मार्गदर्शना खाली क़सबा मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित कंक यांनी फारासखाना पोलिस ठाण्यात येथे तक्रार दाखल केली आहे. संबंधित समाजकंटका वर गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
या वेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार दांमगुडे , भाजप कसबा मतदारसंघ चिटनीस अमोल शुक्ला , पुणे शहर कार्यालय मंत्री संजय मामा देशमुख , युवा मोर्चा सरचिटणीस राजू परदेशी , दीपक पवार , सुनील मिश्रा , युवा मोर्चा संपर्क प्रमुख मनीष जी पाडेकर , ओबीसी आघाडी शहर युवा मोर्चा प्रमुख तुषार रायकर ,क़सबा मतदारसंघ युवा मोर्चा सरचिटणीस प्रणव गंजीवाले , संपर्क प्रमुख सुरेंद्र ठाकुर , प्रभाग 15 युवा मोर्चा उपाध्यक्ष कुणाल आहेर आदि पदाधिकारी उपस्थित होते.