पुणे, दि. २६/०६/२०२३: पाउस सुरु असल्यामुळे सोसायटीच्या आडोशाला थांबणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. तारेच्या कुंपनात असलेल्या वीजप्रवाहामुळे हात लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २४ जूनला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील ब्रम्हा इस्टेट सोसायटीनजीक घडली.
अजयकुमार विनोदकुमार वर्मा (वय ३०, रा. पवार चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विनोदकुमार वर्मा (वय ५०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार खाजगी ठिकाणी कामाला होता. २४ जूनला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो पायी जात होता. त्यावेळी पाउस सुरु झाल्यामुळे अजयकुमार ब्रम्हा इस्टेट इमारतीच्या आडोशाला थांबला. त्यावेळी त्याचा हात तारेच्या कुंपनाला लागला. मात्र,कुंपनामध्ये वीजेचा प्रवाह सुरु असल्यामुळे अजयकुमारला जोराचा वीजेचा धक्का बसला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याचे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते तपास करीत आहेत.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान