May 18, 2024

राजीव गांधी प्राणी संग्रहालय ३१ डिसेंबर पर्यंत मुलांना नि:शुल्क प्रवेश

पुणे,२२ डिसेंबर २०२३ : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आठ वर्षाखालील मुलांना २३ ते ३१ डिसेंबर पर्यंत नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे नाताळ सणानिमित्त महापालिकेतर्फे हा खास उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र यासाठी पालकांना पीएमसी केअर या अॅपवर जाऊन आगाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

उद्यान विभागाने विकसित केलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र हे भारतातील अग्रगण्य प्राणीसंग्रहालय आहे. यामध्ये सस्तन प्राणी,पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यकांमध्ये प्रौंढ नागरिक, लहान मुले, शालेय विद्यार्थी तसेच विदेशी पर्यटकांना प्रवेश देणेसाठी तिकीट आकारणी करणेत येत असते.

नाताळ सणाचे औचित्य साधून दिनांक २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ८ वर्षाखालील लहान मुलांना (उंची ४ फुट ४ इंचा पर्यंत) नि: शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे.
प्राणी संग्रहालय निःशुल्क पाहण्याकरिता नोंदणी पीएमसी केअर अॅप व संकेतस्थळावरून ऑनलाईन केल्यानंतर मोफत प्रवेशदिला जाणार आहे. तरी या संधीचा फायदा सर्व लहान मुलांनी घ्यावा असे आवहान पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.