May 14, 2024

भारतातील ज्योतिर्लिंग सहलीसह राम कथा भारत गौरव पर्यटक गाड्या

पुणे, ०१/०८/२०२३: आईआरसीटीसी द्वारे आयोजित भारत गौरव टुरिस्ट गाड्या प्रवाशांना एका असाधारण आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातात व जय भारताला एकत्र आणतात व परंपराचे संवर्धन करतात. भारत गौरव ट्रेनचा प्रवास प्रभू रामाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी आणि सत्य, प्रेम, करुणा या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या गहन दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे.

हा अध्यात्मिक प्रवास सुलभ करण्यासाठी आईआरसीटीसी ने खास डिझाईन केलेल्या “राम कथा यात्रा” चे आयोजन केले आहे जी 22 जुलै रोजी हजरत निजामुद्दीन येथून एकूण 1008 यात्रेकरूंना घेऊन निघाली आहे. ह्या गाड्या 11000 कि.मी.अंतरासह 9 राज्ये ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तराखंड इ. मधून जाईल आणि भक्तांना काशी विश्वनाथ, महाकालेश्वर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर, बैद्यनाथ धाम, ओंकारेश्वर इत्यादींसह प्रतिष्ठित 12 ज्योतिर्लिंग मंदिरांसह तिरुपती बालाजी दर्शनासह तुम्हाला एका अभूतपूर्व प्रवासाला घेऊन जाईल.

राम कथा वाचक पूज्य श्री मोरारी बापू, ज्यांच्या प्रवचनांनी लाखो लोकांच्या हृदयाला प्रेरणा दिली आणि रामचरित मानस कथनातून श्रोत्यांच्या आत्म्याला स्पर्श केला आहे. ते रामचरित मानस चे प्रवचन करतात आणि त्यांनी मागील 60 वर्षांत 900 हून अधिक कथा विनामूल्य आयोजित केल्या आहेत . ते म्हणतात की रामचरितमानस प्रत्येक सजीवाचे कल्याण व विकासासाठी आहे. बापू जीवनाच्या आवश्यक गोष्टींबद्दल जागरुकता पसरवतात ज्यामुळे कथेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक तरुणांना आवड निर्माण होते. मत्सर, निंदा, टीका, द्वेष या मानसिक त्रासातून लोकांनी बाहेर यावे अशी शिकवण देतात . बापू पर्यावरणाच्या मुद्द्यांचेही समर्थन करतात. ते ‘प्रवाही परंपरेवर’ विश्वास ठेवतात आणि 21 व्या शतकात ते पुरोगामी आदर्शांसाठी भाष्य करतात. बापूंचा मूळ संदेश म्हणजे सत्य-प्रेम-करुणा याविषयी जागरुकता वाढवणे. या यात्रेचा उद्देश केवळ राम कथेच्या कालातीत ज्ञानाचे स्मरण करणे नाही तर एकता आणि शाश्वत मार्गदर्शक तत्त्वांची सामूहिक समज वाढवणे हा आहे. भारत गौरव रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी पूज्य श्री मोरारी बापूंच्या प्रवचनात तल्लीन होत आहेत .

पूज्य श्री मोरारी बापू 01 ऑगस्ट रोजी सहप्रवाशांसह पुण्यात आले आणि ते पवित्र ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर येथे पोहोचले जिथे श्री राम कथेचे आयोजन केले आहे. आणि पुण्याहून 2 ऑगस्ट रोजी नाशिकला जाऊन पवित्र ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतील.

सुंदर विनाइल रॅपिंगने गाड्या सजवण्यात आल्या आहेत ज्यात ज्योतिर्लिंग, मंदिरे, धाम ,तिरुपती बालाजी मंदिर आणि पूज्य मोरारी बापूजी यांचे चित्र दाखवण्यात आले आहे आणि खूपच सुंदरपणे यात्रेचे आध्यात्मिक सार दाखवण्यात आले आहे.

पवित्र श्रावण महिन्यात या तीर्थयात्रेचे महत्त्व अध्यात्मिक अनुभवात भर घालते, ज्यामुळे ती सर्व प्रवाशांसाठी एक उल्लेखनीय उपलब्धी ठरेल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही प्रभू श्रीराम यांच्या नाम महात्म्याच्या वैभवाची आठवण करून देणारी आहे. ही ट्रेन भारताच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेची साक्ष आहे जी लोकांना एकता, सांस्कृतिक सौहार्द यांद्वारे जोडते. या प्रवासाची सांगता 09 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीत होईल.