May 5, 2024

एमईएस सीनियर कॉलेजच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय जलतरण स्पर्धा

पुणे, 02/10/2023: दिक्षा यादव, भक्ती वाडकर आणि शुभम धायगुडे यांनी एमईएस सीनियर कॉलेजच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

डेक्कन जिमखाना येथील टिळक तलावावर ही स्पर्धा झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा मंडळाचे सदस्य मनोज एरंडे आणि वरिष्ठ अधिकारी शिवाजी उत्तेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी एमईएस सीनियर कॉलेजचे प्रोग्राम को-ऑर्डिनेटर डॉ. पूनम रावत, डॉ. दीपक माने आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्याच्या दिक्षा यादवने ५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर फ्रीस्टाइल, २०० मीटर फ्रीस्टाइल, ४०० मीटर फ्रीस्टाइल, ८०० मीटर फ्रीस्टाइल, ५० मीटर बटरफ्लाय, १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. यानंतर शुभम धायगुडेने ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर बटरफ्लाय, ४०० मीटर फ्रीस्टाइल, ८०० मीटर फ्रीस्टाइल, २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. भक्तीने १०० मीटर बॅकस्ट्रोक, २०० मीटर बॅकस्ट्रोक, २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये बाजी मारली.

निकाल – ५० मीटर फ्रीस्टाइल (पुरुष) – सोहिल पवार (२४.७२ से.) – पुणे शहर, श्वेजल मानकर (२५.२६ से.) – पुणे शहर, प्रथम गदख (२८.४७ से.) – नाशिक. महिला – दिक्षा यादव (२९.८५ से.) – पुणे जिल्हा, साध्वी धुरी (३१.०६ से.) – पुणे शहर, नेहा सागरे (३३.४७ से.) – पुणे शहर.

२०० मीटर बॅक-स्ट्रोक (पुरुष) – अन्वेष प्रसादे (२ मि. २९.१५ से.) – पुणे शहर, शुभम धायगुडे (२ मि. ३५.४० से.) – पुणे जिल्हा, सौमित्र गोरे (२ मि. ३६.७८ से.) – पुणे शहर.

२०० मीटर बॅक-स्ट्रोक (महिला) – भक्ती वाडकर (२ मि.४०.७२ से.) – पुणे जिल्हा, श्वेता कुरडे (२ मि. ५६.४० से.) – पुणे जिल्हा, श्रेया वांजळे (३ मि. १९.१२ से.) – पुणे शहर.

१०० मीटर बटरफ्लाय (पुरुष) – शुभम धायगुडे (१ मि. ०२.०३ से.) – पुणे जिल्हा, तनीष कुडले (१ मि. ०२.३७ से.) – पुणे शहर, सार्थक सोनार (१ मि.०४.७५ से.) – नाशिक

२०० मीटर फ्रीस्टाइल (महिला) – दिक्षा यादव (२ मि. ३३.१६ से.) – पुणे जिल्हा, साध्वी धुरी (२ मि. ५३.२५ से.) – पुणे शहर, अंजली थोरात (३ मि. ०७.४४ से.) – पुणे शहर.

१०० मीटर बॅकस्ट्रोक (पुरुष) – अन्वेष प्रसादे (१ मि.०७.३८ से.) – पुणे शहर, सौमित्र गोरे (१ मि. ११.८५ से.) – पुणे शहर, विनायक काकर (१ मि. २३.४० से.) – नाशिक.

१०० मीटर बॅकस्ट्रोक (महिला) – भक्ती वाडकर (१ मि. १२.८२ से.) – पुणे जिल्हा, श्वेता कुरडे (१ मि. १५.९४ से.) – पुणे जिल्हा, नेहा सागरे (१ मि. ३२.२५ से.) – पुणे शहर.

४०० मीटर फ्रीस्टाइल (पुरुष) – शुभम धायगुडे (४ मि.३१.०३ से.) – पुणे जिल्हा, अथर्व भाकरे (४ मि. ३८.५० से.) – पुणे जिल्हा, सौमिल कोवाडकर (५ मि. १०.६६ से.) – पुणे शहर

४०० मीटर फ्रीस्टाइल (महिला) – दिक्षा यादव (५ मि. २२.१८ से.) – पुणे जिल्हा, दिव्या मारणे (६ मि. ०१.७२ से.) – पुणे शहर, स्वानंदी पवार (७ मि. १५.१५ से.) – नाशिक.

५० मीटर बटरफ्लाय (पुरुष) – शुभम धायगुडे (२६.५८ से.) – पुणे जिल्हा, साहिल पवार (२६.७२ से.) – पुणे शहर, श्वेजल मानकर (२७.४७ से.) – पुणे शहर.

५० मीटर बटरफ्लाय (महिला) – दिक्षा यादव (३२.७२ से.) – पुणे जिल्हा, साध्वी धुरी (३३.३१ से.) – पुणे शहर, अंजली थोरात (३९.८४ से.) – पुणे शहर.

८०० मीटर फ्रीस्टाइल (महिला) – दिक्षा यादव (१० मि.५३.४० से.) – पुणे जिल्हा, श्रेया वांजळे (१२ मि.५९.४७ से.) – पुणे शहर, दिव्या मारणे (१३ मि. ००.७५ से.) – पुणे शहर.

८०० मीटर फ्रीस्टाइल (पुरुष) – शुभम धायगुडे (१० मि. ४२.७९ से.) – पुणे जिल्हा, अथर्व भाकरे (१० मि.४३.०३ से.) – पुणे शहर, सौमिक कोवाडकर (१० मि.५३.३० से.) – पुणे शहर.

१०० मीटर फ्रीस्टाइल (महिला) – दिक्षा यादव (१ मि. ०६.५६ से.) – पुणे जिल्हा, साध्वी धुरी (१ मि. ०७.०९ से.) – पुणे शहर, अंजली थोरात (१ मि. २५.६३ से.) – पुणे शहर.

२०० मीटर वैयक्तिक मिडले (पुरुष) – शुभम धायगुडे (२ मि. ३०३.३६ से.) – पुणे जिल्हा, तनीष कुडले (२ मि. ३०.९६ से.) – पुणे शहर, अथर्व भाकरे (२ मि. ३२.३४ से.) – पुणे जिल्हा.

२०० मीटर वैयक्तिक मिडले (महिला) – भक्ती वाडकर (२ मि. ५३.८८ से.) – पुणे जिल्हा, साध्वी धुरी (३ मि. १९.४३ से.) – पुणे शहर, तनीष्का पाटील (६ मि.२८.७९ से.) – नाशिक.

५० मीटर बॅकस्ट्रोक (महिला) – भक्ती वाडकर (३३.७२ से.) – पुणे जिल्हा, श्वेता कुरडे (३६.७२ से.) – पुणे जिल्हा, नेहा सागरे (४२.८३ से.) – पुणे शहर.

२०० मीटर बटरफ्लाय (पुरुष) – शुभम धायगुडे (२ मि. २४.६२ से.) – पुणे जिल्हा, तनीष कुडले (२ मि. २७.०३ से.) – पुणे शहर, ओम दळवी (३ मि. २१.४३ से.) – पुणे शहर.

१५०० मीटर फ्रीस्टाइल (महिला) – दिक्षा यादव (२१ मि. १६.३५ से.) – पुणे जिल्हा, श्वेता कुरडे (२१ मि. ५६.८४ से.) – पुणे जिल्हा.