May 12, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत यार्डी संघाचा दुसरा विजय

पुणे,29 फेब्रुवारी, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत  यार्डी संघाने दुसरा, तर  मास्टरकार्ड, कॉग्निझंट संघांनी पहिला विजय नोंदवला. 
 
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सौरभ देवरे 58धावा व 3-11) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर यार्डी संघाने सिमेन्स संघाचा 41 धावांनी पराभव केला.प्रथम फलंदाजी करताना सौरभ देवरे 58, सौरभ जळगावकर 52, हृषिकेश पटवर्धन 34, जीवन गोसावी 20 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर यार्डी संघाने 20 षटकात 5बाद 175धावा केल्या. याच्या उत्तरात सिमेन्स संघाला निर्धारित षटकात 9बाद 134धावाच करता आल्या. यात विशाल रैना 19, अमित कुलकर्णी 15, पारस बजाज 21, निखिल पाटील 16 यांनी थोडासा प्रतिकार केला. यार्डीकडून सौरभ देवरे(3-11), मयूर राठोड(3-20) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 41 धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात अभिजीत परिदा याने (103धावा) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर मास्टरकार्ड संघाने सीजीआय संघाचा 101 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अन्य लढतीत राकेश चव्हाण(5-15) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कॉग्निझंट संघाने एन्कोरा संघाचा 123 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
 
निकाल: साखळी फेरी:
मास्टरकार्ड: 20 षटकात 4बाद 206धावा(अभिजीत परिदा 103(61,12×4,4×6), आशुतोष पाटील 45(34,3×4,2×6), प्रत्युश साहू 41(23,5×4,1×6), सचिन पाटील 2-7) वि.वि.सीजीआय:18.4 षटकात सर्वबाद 105धावा(मंदार पाटील 30(27,5×4), अभिजीत शेळके 19, प्रणिल कुलकर्णी 12, सूरज खाडे 13, योगेश चौधरी 3-15, राहुल गायकवाड 3-11, रमाकांत शिंदे 2-23, पवन व्यास 2-18);सामनावीर-अभिजीत परिदा; मास्टरकार्ड संघ 101 धावांनी विजयी;
 
कॉग्निझंट: 20 षटकात 1बाद 228धावा(संदीप राज नाबाद 88(33,6×4,8×6), सात्विक 70(41,6×4,4×6), अर्पित राज नाबाद 50(48,4×4), पृथ्वीराज जाधवराव 1-34) वि.वि. एन्कोरा : 18.3 षटकांत सर्वबाद 105धावा(अमोल निगडीकर 23, पृथ्वीराज जाधवराव 13, अविनाश थोरात 11, राकेश चव्हाण 5-15, आकाश निरंजन 2-7); सामनावीर-राकेश चव्हाण; कॉग्निझंट संघ 123 धावांनी विजयी;
यार्डी:20 षटकात 5बाद 175धावा(सौरभ देवरे 58(37,1×4,5×6), सौरभ जळगावकर 52(32,7×4,2×6), हृषिकेश पटवर्धन 34(26,4×4), जीवन गोसावी 20, विशाल राजा 2-45, पारस बजाज 2-28)वि.वि.सिमेन्स: 20 षटकात 9बाद 134धावा(विशाल रैना 19, अमित कुलकर्णी 15, पारस बजाज 21, निखिल पाटील 16, सौरभ देवरे 3-11, मयूर राठोड 3-20); सामनावीर-सौरभ देवरे; यार्डी संघ 41 धावांनी विजयी;