April 29, 2024

ध्यानाने मिळणार्‍या वैश्विक ऊर्जेने शरिर आरोग्यमय बनते – ब्रम्हर्षी शशिकांत जोशी

पुणे, २७/०८/२०२३: मेडिटेशन म्हणजेच ध्यान हे भारतीय लोकांसाठी नवे नाही. स्वतःला जाणून घेण्यासाठी ध्यान जीवनात महत्त्वाचे आहे. ध्यानाने आपण वैश्विक ऊर्जाशी जोडले जातो, आपल्या मनातील विचार शून्य होतात. हीच वैश्विक ऊर्जा मानवी शरीराला आरोग्यमय बनविते, असे प्रतिपादन संत तुकाराम पिरामिड ध्यान केंद्राचे प्रमुख ब्रम्हर्षी शशिकांत जोशी यांनी केले.

पुण्यातील लोहगाव येथे संत तुकाराम पिरामिड ध्यान केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सिनियर मास्टर विजय कुमार, प्रमोद कुशवाहा, एमजी मोरे अणि अन्य उपस्थित होते. यावेळी ध्यान या विषयावर हिंदी व मराठी भाषेतून सखोल मार्गदर्शन केले.

जोशी म्हणाले की शरिर एक वैश्विक ऊर्जेने भरलेले आश्चर्यकारण यंत्र आहे, ते सतत अवांछनीय विचारांने धावत असते, आपल्या श्वासावर ध्यांन केंद्रित केल्याने मन विचार शुन्य होतात त्यावेळी वैश्विक उर्जा ती पोकली भरून टाकते, आपली चेतना वैश्विक ऊर्जेशी जोढली जाते तेंव्हा तो अनुभव आनंद चिन्मयानंद असतो.
पुढे ते म्हणाले की, आपण खरेतर जन्मापासून ध्यानी आहोत. झोपेत आपण ध्यांनात जात असतो त्या वेळी आंतरिक चेतना शरिर सोडून ब्रम्हांडात फिरून परत शरिरात येत असते. यामुळेच सकाली झोपेतून उठल्यावर आपले शरिर ताजेतवाने होते व नविन उर्जाने शरिर उत्स्फुर्त होते. ध्यान आपण कुठेही, कसेही करू शकतो असेही ते म्हणाले.