April 29, 2024

पुणे: थकीत कर्जासाठी महिलांना धमकावणी, वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांवर गुन्हा

पुणे, २७/०८/२०२३: खासगी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या कुटुंबीयांना अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका खासगी वित्तीय संस्थेतील सात कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतील सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेने ए यु स्माॅल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतून कर्ज घेतले होते़ त्याचे हप्ते थकल्याने बँकचे अधिकारी सुशिल याने बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फिर्यादी महिलेच्या घरी पाठविले.

ते मद्यधुंद अवस्थेत या महिलेच्या घरी गेले. त्यांनी या महिलेला तसेच घरातील महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या अंगावर धावून जाऊन विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे तपास करत आहेत.