July 27, 2024

तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

पुणे,दि.7 नोव्हेंबर 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत आर्यन घाडगे,सावी पांचाळ, संचीता नगरकर, ध्रुवी आद्यंतया, सहना कमलाकन्नन, श्रेया पठारे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून आजचा दिवस गाजवला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आर्यन घाडगेने आठव्या मानांकित पार्थ सोमाणीचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला.
मुलींच्या गटात गुजरातच्या सावी पांचाळने आपली राज्य सहकारी अव्वल मानांकित हिरवा रंगानीचा 5-7, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव खळबळजनक निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या बिगरमानांकित श्रेया पठारेने तेलंगणाच्या पाचव्या मानांकित अपेक्षा कांदाडीचा 6-1, 6-4 असा तर, संचीता नगरकरने चौथ्या मानांकित श्रुती नानजकरचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ध्रुवी आद्यंतयाने सातव्या मानांकित आर्या बोरकरचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. तामिळनाडूच्या सहना कमलाकन्ननने दुसऱ्या मानांकित अभिलीप्सा मल्लिकचा 6-3, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: दुसरी फेरी: मुले:
पार्थ देवरुखकर(महा)(1)वि.वि.अर्णव बनसोडे(महा) 6-0, 6-4;
ओंकार शिंदे(महा)(6)वि.वि.आदित्य अय्यंगर(महा)6-3, 6-4;
जय पवार(महा)(3)वि.वि.सुहास सोमा(कर्नाटक) 6-3, 6-3;
आर्यन घाडगे (महा)वि.वि.पार्थ सोमाणी(महा)(8)6-2, 6-2;
फतेहब सिंग(महा)(5)वि.वि.नीरज रिंगणगावकर (महा)6-3, 3-6, 6-1;
अनमोल नागपुरे(महा)(4)वि.वि.नील जोगळेकर (महा)6-1, 6-2;
सार्थ बनसोडे(महा)(7)वि.वि.प्रणव एसआर(तामिळनाडू)6-1, 6-3;
आश्विन नरसिंघानी (महा) वि.वि.पियूश जाधव(महा)6-1, 6-1;
मुली:
सावी पांचाळ (गुजरात) वि.वि.हिरवा रंगानी (गुजरात)(1) 5-7, 6-1, 6-4;
आनंदी भुतडा(महा)(8) वि.वि.नूर पांडा (महा) 6-0, 6-0;
काव्या देशमुख(महा) वि.वि.आरोही देशमुख(महा)5-7, 6-3, 6-1;
स्वानिका रॉय (महा) वि.वि.पार्थसारथी मुंढे(महा) 6-3, 6-0;
श्रेया पठारे(महा)वि.वि. अपेक्षा कांदाडी(तेलंगणा)(5) 6-1, 6-4;
संचीता नगरकर(महा) वि.वि.श्रुती नानजकर(महा)(4) 6-2, 6-1;
ध्रुवी आद्यंतया (महा) वि.वि.आर्या बोरकर (महा)(7) 6-0, 6-0;
सहना कमलाकन्नन(तामिळनाडू) वि.वि.अभिलीप्सा मल्लिक (महा)(2) 6-3, 6-4.