April 27, 2025

कै विनायक निम्हण स्मृती करंडक 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत 16 संघ सहभागी

पुणे, 4 ऑगस्ट 2023: सनी  स्पोर्टस किंगडम आणि सोमेश्वर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै विनायक निम्हण स्मृती करंडक 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत शहरांतील 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सनी स्पोर्टस, पाषाण रोड येथे 5 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत युकेएम एफसी, लौकिक एफसी, चोंदे पाटील, फाल्कन्स, युकेएम एफसी ब, हॉटफुट, गो प्रो, 4लायन्स बावधन, 4लायन्स अ आणि ब हे संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा कुमार गटात होणार आहे. तसेच हि स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असल्याचे सनी स्पोर्टस वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांनी सांगितले.