June 5, 2026

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ट्रिनिटी व पीबीसीए यांच्यात अंतिम लढत

पुणे, दि.4 जून 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए) व ट्रिनिटी या संघांनी अनुक्रमे अँबिशियस व पूना क्लब या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी मैदानावरील उपांत्य फेरीच्या लढतीत आयुष रक्ताडे 2-46 व नाबाद 30) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए) संघाने अँबिशियस संघाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना पीबीसीएच्या वेंकटेश बेहेरे(3-37), आयुष रक्ताडे(2-46), धनंजय झोरे(2-40) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे अँबिशियस संघाचा डाव 44.2षटकात सर्वबाद 198 धावावर संपुष्टात आला. यात वेदांत हांचे 57, आयुष म्हाळसकर 28, अनुराग सिंग 18, ओंकार कदम 17 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए) संघाने 27.2षटकात 6बाद 199धावा काढून हे आव्हान पूर्ण केले. यात ओम भामरेने 37चेंडूत 5चौकारासह 34धावा, अनिश जोशीने 50चेंडूत 4चौकाराच्या सहाय्याने नाबाद 34 धावा केल्या. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 66चेंडूत 59धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर अनिश याने आयुष रक्ताडे(नाबाद 30) च्या साथीत सहाव्या विकेटसाठी 33चेंडूत 44 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

नेहरू स्टेडियम येथील उपांत्य फेरीच्या लढतीत अमन सिंग(नाबाद 77) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर ट्रिनिटी संघाने पूना क्लब संघाचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी मैदान:
अँबिशियस: 44.2षटकात सर्वबाद 198 धावा(वेदांत हांचे 57(89,8×4,1×6), आयुष म्हाळसकर 28, अनुराग सिंग 18, ओंकार कदम 17, वेंकटेश बेहेरे 3-37, आयुष रक्ताडे 2-46, धनंजय झोरे 2-40) पराभूत वि. पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए): 27.2षटकात 6बाद 199धावा(ओम भामरे 34(37,5×4), आयुष रक्ताडे नाबाद 30(16,2×4,3×6), अनिश जोशी नाबाद 34(50,4×4), राम राठोड 28, कौशिक सूर्यवंशी 23, राघव नाईक 21, आर्यन यादव 3-45, ओंकार कदम 1-23); सामनावीर – आयुष रक्ताडे; पीबीसीए 4 गडी राखून विजयी;

नेहरू स्टेडियम मैदान:
पूना क्लब: 42.4षटकात सर्वबाद 148 धावा(अनिकेत शिंदे 51(78,7×4), क्षितिज येडे 33,मिलिंद आहिरे 17, मयंक अगरवाल 14, श्रवण शिर्के 3-24, अद्विक तिवारी 2-18, प्रतीक कडलक 2-26) पराभूत वि. ट्रिनिटी: 27षटकात 2बाद 149धावा(अमन सिंग नाबाद 77(55,8×4,3×6), प्रेम इघे 45(76,4×4), संग्राम कांबळे 19, मयंक अगरवाल 1-16); सामनावीर – अमन सिंग; ट्रिनिटी 8 गडी राखून विजयी.

You may have missed