पुणे, 11 सप्टेंबर, 2023: पुना क्लब लिमिटेड आयोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत गटसाखळी फेरीत मनिषा रॉयल्स, आरएस कॅनन्स, रॅक रायडर्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पुना क्लब स्नूकर हॉल येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात मिनू कारकरीया, कुणाल वासवानी, आर.के.शर्मा, अंगद सहानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मनिषा रॉयल्स संघाने परमार ऑल स्टार्स संघाचा 4-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात आरएस कॅनन्स संघाने टोर्नाडोज 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून रिकी राजपाल, माधव क्षीरसागर, निशांत मेहता, आनंद केरिंग यांनी अफलातून कामगिरी केली.
अन्य लढतीत रॅक रायडर्स संघाने बॉल ब्रेकर्स संघावर 4-1 असा विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा, मनिषा कन्स्ट्रकशनचे संचालक, बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि बीएसएफ आयचे माझी अध्यक्ष राजन खिंवसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक कपिल पंजाबी, कारा इंटलेक्टचे रणजीत पांडे, विघ्नेश सांघवी, संजय संघवी, मुकेश संघवी, सूरज राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
थ मोदी 4-3;
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी:
अ गट: मनिषा रॉयल्स वि.वि.परमार ऑल स्टार्स 4-1(
अ गट: आरएस कॅनन्स वि.वि.टोर्नाडोज 3-2(15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर: रिकी राजपाल वि.वि.अनिल काकडे 88-58; 15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर दुहेरी: माधव क्षीरसागर/निशांत मेहता वि.वि.विशाल अरोरा/फारूख मोदी 115-68; हॅन्डीकॅप बिलियर्ड्स: आनंद केरिंग वि.वि.योहान थडानी 200-154; 6 रेड हॅन्डीकॅप स्नूकर: प्रणय माळगावकर पराभुत वि.आकाश दलवाणी 65-55,46-58, 32-46; ब्लु शॉट माधव क्षीरसागर पराभुत वि.फारूख मोदी 3-4:
ब गट: रॅक रायडर्स वि.वि.बॉल ब्रेकर्स 4-1(15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर: मुनीझ पूनावाला वि.वि.विनोद मखिजा 105-79;15 रेड हॅन्डीकॅप स्नूकर दुहेरी: आशिष पटेल/अनिकेत संघवी वि.वि.रणजित पांडे/अंकित दामले 101-87; हॅन्डीकॅप बिलियर्ड्स: रमेश केरिंग वि.वि.टोनी शेट्टी 200-179; 6रेड हॅन्डीकॅप स्नूकर स्नूकर: अयान खान पराभुत वि.प्रशांत राजघरिया 33-42, 46-33, 35-74; ब्लु शॉट:मुनीझ पूनावाला वि.वि.अंकित दामले 4-3).
More Stories
पुणे: मोक्कासह तब्बल ५३ गुन्हयात पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुणे: हडपसर भागातील गुंड टोळीविरुद्ध मोक्का कारवाई
पुणे: तब्बल १५० घरफोडीचे गुन्हे केलेला अट्टल चोरटा अटकेत, २२ लाख २० हजारांचे दागिने जप्त