पुणे, 16 फेब्रुवारी 2026: – आॅलिंपिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत 10 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टिळक तलाव येथे 18 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक शौर्य करंदीकर यांनी सांगितले की, जलतरण क्षेत्राची अग्रणी संघटना असलेल्या स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने डेक्कन जिमखान्याच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ‘कॅट कंट्रोल’ चे श्री. हेमंत कटककर यांचे या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून सकाळी 9पासून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेसाठी डेक्कन जिमखान्यासह अमरावती जिल्हा संघ, भारतीय हवाईदल(इंडियन एअरफोर्स), भारतीय नौदल(इंडियन नेव्ही), सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साऊथ रेल्वे, रिलायन्स रायगड, त्रिवेंद्रम क्लब केरळ आणि बंगळूर हे संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेसाठी कटक्कर करंडकासह विजेत्या संघांना रोख पारितोषिकही दिले जाणार आहे.
स्पर्धेत अश्विनीकुमार कुंडे, उदय उत्तेकर, श्रेयस वैद्य, भागेश कुटे, तपस मंडल, अनिश कुमार, अभिनव एस, आदर्श व्हीएस हे आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, मणिपूर आणि गुजरात या ठिकाणांहून 20 हुन अधिक भारतीय आंतरराष्ट्रीय वॉटर पोलो खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेत एकूण Rs.1,00,000/- रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

More Stories
एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रिभव सारोहा, माओ ताझुरू यांचे विजय
32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत जीओजी एफसी, सीएमएस फाल्कन्स, थंडरकॅट्ज एफसी यांचे सनसनाटी विजय