पुणे, ०३ एप्रिल २०२६ : महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी किडझ किंगडम प्री-प्रायमरी स्कूलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराचे उद्घाटन प्राचार्या वैभवी सोळंकी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना वैभवी सोळंकी म्हणाल्या, “रक्तदान हे मानवतेचे सर्वोच्च प्रतीक आहे. रक्ताची निर्मिती कृत्रिमरीत्या करता येत नसल्यामुळे रक्तदान हाच एकमेव पर्याय आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.”
अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया तसेच थॅलेसेमिया व कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये रक्ताची नितांत गरज भासत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला विश्वराज हॉस्पिटलचे डॉक्टर, शाळेचे शिक्षक आणि पालक उपस्थित होते. रक्तसंकलनाची जबाबदारी विश्वराज हॉस्पिटलच्या ब्लड बँकेने पार पाडली. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन