July 24, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स संघाचा विलास क्रिकेट क्लबवर विजय

पुणे, दि. 18 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत निलय शिंगवी(5-37) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने विलास क्रिकेट क्लबवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी विलास क्रिकेट क्लबचा पहिला डाव आज 33.4 षटकात सर्वबाद 138धावावर संपुष्टात आला. तत्पूर्वी काल केडन्स संघाने 56.4 षटकात सर्वबाद 254धावा केल्या. यात मोहम्मद अरकम सईदने 55चेंडूत 12चौकाराच्या मदतीने 59 धावा, ओंकार भागवतने 42चेंडूत 10चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा, ईशान लोयाने 30 धावा, मल्हार अडक 20, मनलीव सिंग घई 19, अनुज साळवी 38 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. केडन्सकडून ओंकार भागवत(5-31), मल्हार आडक(2-14), पार्थ कांबळे(2-50)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 116 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात विलास क्रिकेट क्लब वर फॉलोऑन ची नामुष्की ओढवली. या डावात विलास क्रिकेट क्लबचा डाव 36.1षटकात सर्वबाद 122 धावावर कोसळला. यात रौनक दुबे 31, गणेश बाड 24, धनंजय पावडे 16, विराज आवळेकर 15 यांनी धावा केल्या.केडन्सकडून निलय शिंगवी(5-37), मल्हार अडक(2-30),ओमकार भागवत(1-23) यांनी अचूक गोलंदाजी केली. केडन्सला विजयासाठी केवळ 6धावांची आवश्यकता होती. हे आव्हान केडन्स संघाने 3.4 षटकात बिनबाद 7 धावा करून पुर्ण केले. यात अनुज साळवीने नाबाद 5, सोनिक पिसे नाबाद 0धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी मैदान:
पहिला डाव: केडन्स: 56.4 षटकात सर्वबाद 254धावा वि. विलास क्रिकेट क्लब : 33.4 षटकात सर्वबाद 138धावा(हरिओम काळे 46(64,3×4,4×6), अनुराग शेळके नाबाद 32(38,4×4,1×6), अथर्व पाटील 15, विराज आवळेकर 13, ओंकार भागवत 5-31, मल्हार आडक 2-14, पार्थ कांबळे 2-50); केडन्स संघाकडे पहिल्या डावात 116धावांची आघाडी;
दुसरा डाव: विलास क्रिकेट क्लब: 36.1षटकात सर्वबाद  122 धावा(रौनक दुबे 31(66,6×4), गणेश बाड 24, धनंजय पावडे 16, विराज आवळेकर 15, निलय शिंगवी 5-37, मल्हार अडक 2-30, ओमकार भागवत 1-23) वि . केडन्स: 3.4 षटकात बिनबाद 7 धावा (अनुज साळवी नाबाद 5, सोनिक पिसे नाबाद 0); सामना अनिर्णीत;केडन्स संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.