पुणे, २१ एप्रिल २०२५ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (बीएएनआरएफ) २०२३-२४ ची जाहिरात अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परिणामी संशोधक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. त्याच अनुषंगाने संशोधक कृती समितीने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. दरम्यान असे न झाल्यास बार्टी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
समितीने यापूर्वीही अनेक वेळा निवेदने दिली असून, प्रत्यक्ष भेटीद्वारेही मागणी केली होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. समितीने बार्टीवर सामाजिक न्यायाच्या तत्वांना फाटा देत असल्याचा आरोप केला आहे.
बीएनएआरएफ ही अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी.अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी अधिछात्रवृत्ती आहे. २०१३ पासून बार्टीद्वारे ही अधिछात्रवृत्ती देण्यात येत आहे. परंतु २०२३-२४ ची जाहिरात अद्याप जाहिर न झाल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे. याचीच दखल घेत संशोधक कृती समितीने सामाजिक न्याय मंत्री आणि महासंचालकांना निवेदन सादर करून आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. तसचे यावर कोणत्याही प्रकारे कारवाई न झाल्यास २८ एप्रिल २०२५ पासून बार्टी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

More Stories
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या