March 5, 2026

पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धेत रिओज सोलर एनर्जी संघाला विजेतेपद

पुणे, 12 फेब्रुवारी 2026: पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा 2026(पीसीबीएसएल) स्पर्धेत अंतिम फेरीत रिओज सोलर एनर्जी संघाने आरएस कॅनन्स संघाचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पुना क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये मुख्य प्रायोजक मनिषा कन्स्ट्रक्शनचे राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा आणिसहप्रायोजक सुनील हांडा, मुकेश संघवी, संजय संघवी यांच्या पाठिंब्यामुळे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत 15 रेड स्नूकर एकेरीत रिओज सोलर एनर्जीच्या सूरज राठीने आरएस कॅनन्सच्या रिकी राजपालचा 73-48 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर बिलियर्ड्समध्ये रिओज सोलर एनर्जीच्या साहिल हांडाने कैवल्य खानापुरेचा 200-167 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. रुलेटमध्ये आरएस कॅनन्सच्या कैवल्य खानापुरे, रिकी राजपाल, पंकज परमार, अनिल काकडे, क्रिश रघानी यांनी रिओज सोलर एनर्जीच्या मिनू कारकरिया, नीरज अरोरा, सुरज राठी, कपिल सामंत, साहिल हांडा यांचा 1-0 असा पराभव करून हि आघाडी कमी केली. पण 9 रेड स्नूकर दुहेरीत ठीने आरएस कॅनन्सच्या रिकी राजपालचा 73-48 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर बिलियर्ड्समध्ये रिओज सोलर एनर्जीच्या निरज अरोराने कपिल सामंतच्या साथीत अनिल काकडे व क्रिश रघानी यांचा 67-30 असा पराभव करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.

स्पर्धेतील विजेत्या संघाला शांतीलाल संघवी स्मृती करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक, पुना क्लबच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष व लीगचे चेअरमन तुषार आसवानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शशांक हळबे, पुना क्लबचे माजी अध्यक्ष सुनील हांडा, मुकेश संघवी, संजय संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: अंतिम फेरी:
रिओज सोलर एनर्जी वि.वि.आरएस कॅनन्स 3-1(15 रेड स्नूकर एकेरी: सूरज राठी वि.वि.रिकी राजपाल 73-48; बिलियर्ड्स: साहिल हांडा वि.वि.कैवल्य खानापुरे 200-167; रुलेट: मिनू कारकरिया/नीरज अरोरा/सुरज राठी/कपिल सामंत/साहिल हांडा पराभुत वि.कैवल्य खानापुरे/रिकी राजपाल/पंकज परमार/अनिल काकडे/क्रिश रघानी 0-1; 9 रेड स्नूकर दुहेरी: निरज अरोरा/कपिल सामंत वि.वि.अनिल काकडे/क्रिश रघानी 67-30).