पुणे, 8 एप्रिल 2026 : पूना क्लब यांच्या वतीने आयोजित चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत आठ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पूना क्लब स्विमिंग पूल या ठिकाणी 9 ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पूना क्लबचे अध्यक्ष व स्विमिंग विभागाचे सचिव गौरव गढोक यांनी सांगितले की, पूना क्लबचे सदस्य असलेल्या विविध संघमालकांनी लिलाव प्रक्रियेतून निवड केलेल्या खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. याप्रसंगी व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव कर्नल सरकार, पीसीएसएल 2026 समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी वेंकीज, व्हेनकॉब व एनईसीसी हे मुख्य प्रायोजक आहेत.
स्पर्धेतील संघ व संघमालक असे आहेत – एएसआर डॉल्फिन्स (अमित रोपलेकर), जेट्स (राकेश नवानी), गोयल गंगा रियल रिच(क्रिश व तारुष गोयल), वेव्ह वॉरियर्स (अली तलब व प्रतीक अगरवाल), अद्विक परमार ऑल स्टार्स (हिरेन परमार व पायल भारतिया), एसके फ्लिपर्स (शैलेश रांका, समीर संघवी व कुणाल संघवी), जॅग्वार्स (मनप्रीत उप्पल व गौरव गढोक), अली टायटन्स (अली दावूवाला)
या लीगबद्दल बोलताना पूना क्लबच्या क्रीडा विभागाचे चेअरमन तुषार आसवाणी म्हणाले की, या स्पर्धेचे संपूर्ण स्वरूप अत्यंत रोमांचकारी व चुरशीचे असून लकी ड्रॉद्वारे एकूण 8संघांमधून प्रत्येकी 4संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील सर्वोत्तम सहा संघ आगेकूच करतील.शनिवार, दिनांक 5 एप्रिल रोजी ग्रँड फायनल्सचे आयोजन करण्यात आले आहे.
तुषार आसवाणी पुढे म्हणाले की, या स्पर्धेबद्दल क्लबच्या सभासदांमधील उत्सुकता कळसाला पोहोचली आहे. यामध्ये 135 क्लबमधील सदस्यांचा समावेश असून 6 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतच्या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, 20 मीटर, 40 मीटर व रीले अशा विविध प्रकारच्या 120 स्पर्धाप्रकारांचा लीगमध्ये समावेश आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष गौरव गढोक, तुषार आसवानी (स्पर्धा संचालक) यांचा समावेश आहे.

More Stories
तिसऱ्या कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आज 11 एप्रिलपासून आयोजन
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत विद्यांचल, डेक्कन जिमखाना अ, महाराष्ट्र मंडळ, सेंट मेरीज संघांचे विजय
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ, विद्यांचल संघांची विजयी आगेकूच