पुणे, 10 एप्रिल 2026: एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या तर्फे तिसऱ्या कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर 11 व 12 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संचालक अनिकेत सोमण यांनी सांगितले कि, या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाऱयांची तंदरुस्ती, खिलाडूवृत्ती या भावनेने, आणि आमची संघटना व सरकारी संस्था यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, या हेतूने या मैत्रीपूर्ण कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून स्पर्धेला मालपाणी ग्रुप यांचे प्रायोजकत्व, तर बीजी शिर्के यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक संघात 5 क्लास वन अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
स्पर्धेत सीजीएसटी, एसजीएसटी, कस्टम्स, पुणे पोलीस, पीएमसी, पीडब्ल्यूडी हे सहा संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पुणे महा नगर पालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पीएमसी आयुक्त नवल किशोर राम(आयएएस) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आणि रणजीत खिरीड आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच, हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

More Stories
स्पर्धा व्यवस्थापनासाठी एआयटीए तर्फे नव्या स्वयंचलित(ऑटोमेटेड) प्रणालीची घोषणा
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देव रुपारेलिया, लक्ष्या राजेश यांना अग्रमानांकन