April 14, 2026

पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ, राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी, नहाटा संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, ,10 एप्रिल, 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात डेक्कन जिमखाना अ, राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी, नहाटा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या लढतीत अभिनव करमरकर(16गुण), आर्यन प्रजापती(11गुण), अंश भाटिया(11गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन जिमखाना अ संघाने एसएसबीए संघाचा 65-42 असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी संघाने शार्पशूटर्स संघाचा 50-25 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाकडून अंकित मुसीब(16गुण) यांनी सुरेख कामगिरी केली.

अन्य लढतीत अमेय दारवाटकर(15गुण), आराध्य भावसार(20गुण) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर नहाटा संघाने सीबीसी संघाचा 64-30 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

निकाल: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
डेक्कन जिमखाना अ: 65(अभिनव करमरकर 16गुण, आर्यन प्रजापती 11गुण, अंश भाटिया 11गुण) वि.वि.एसएसबीए: 42(श्लोक निंबाळकर 12गुण); मध्यंतर: 25-17;

राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी(आरएसबीए): 50(अंकित मुसीब 16गुण) वि.वि.शार्पशूटर्स: 25(प्रद्युम्न नायर 12गुण); मध्यंतर: 24-15;

नहाटा: 64(अमेय दारवाटकर 15गुण, आराध्य भावसार 20गुण) वि.वि.सीबीसी: 30(अन्विता माथुर 8गुण); मध्यंतर: 20-11

गट साखळी फेरी:
एबीसी: 60(दक्ष शर्मा 16गुण) वि.वि.विद्या व्हॅली:16( तनिष सुराणा 8गुण); मध्यंतर: 20-10;

नहाटा: 48(शर्विल हुबळीकर 15गुण) वि.वि.शार्पशुटर्स: 06(प्रद्युम्न नायर 4गुण); मध्यंतर: 33-04;

दस्तुर: 42(अरियाना शिंदे 11गुण) वि.वि.विद्या व्हॅली:16(तेजस्विनी जाधव 6गुण); मध्यंतर: 21-07