पुणे, 10 एप्रिल 2026 : पूना क्लब यांच्या वतीने आयोजित चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत पहिल्या दिवस अखेर एसके फ्लिपर्स, एएसआर डॉल्फिन्स या संघानी अ व ब गटात आघाडी प्राप्त केली आहे.
पूना क्लब स्विमिंग पूल या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत अ गटात एसके फ्लिपर्स संघाने 135 गुणांसह, तर ब गटात एएसआर डॉल्फिन्स संघाने 154 गुणांसह गुण तालिकेत आघाडी घेतली.
स्पर्धेत अ गटात जेट्स व जॅग्वार्स संघ अनुक्रमे 130 व 121 गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. तर, ब गटात वेव्ह वॉरियर्स संघ 124गुणांसह दुसऱ्या स्थानी आणि अद्विक परमार ऑल स्टार्स संघ 115 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. या स्पर्धेसाठी वेंकीज, व्हेनकॉब व एनईसीसी हे मुख्य प्रायोजक आहेत.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पूना क्लबचे अध्यक्ष व स्विमिंग विभागाचे सचिव गौरव गढोक, पूना क्लबच्या क्रीडा विभागाचे चेअरमन तुषार आसवानी आणि प्रायोजक व्हेनकॉबचे अमित रोपलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

More Stories
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत सेंट मेरीज, महाराष्ट्र मंडळ, विद्यांचल, दस्तुर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ, राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी, नहाटा संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
तिसऱ्या कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आज 11 एप्रिलपासून आयोजन