पुणे, 11 एप्रिल, 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात सेंट मेरीज, महाराष्ट्र मंडळ, विद्यांचल, दस्तुर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या सामन्यात सेंट मेरीज संघाने चोंदे पाटील संघाचा 48-37 असा पराभव केला. विजयी संघाकडून अन्विता आखेगावकर(13गुण), ईशल राठोड(16गुण) यांनी सुरेख कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात अनुष्का शुक्ला(22गुण), साक्षी व्यास(13गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र मंडळ संघाने फाल्कन्स संघाचा 45-27 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत विद्यांचल संघाने डेक्कन जिमखाना अ संघावर 52-45 असा विजय मिळवला. विद्यांचल संघाकडून लिलीयन जेकब(31गुण), तनरिका चक्रवर्ती(8गुण) यांनी अफलातून खेळी केली.
निकाल:
मुली: उपांत्यपूर्व फेरी:
सेंट मेरीज: 48(अन्विता आखेगावकर 13गुण, ईशल राठोड 16गुण) वि.वि.चोंदे पाटील: 37(मैत्रेय शहा 8गुण, ईराणी जाधव 8गुण); मध्यंतर: 11-13;
महाराष्ट्र मंडळ: 45(अनुष्का शुक्ला 22गुण, साक्षी व्यास 13गुण) वि.वि.फाल्कन्स: 27(क्रिया कौशिक 12गुण, रिया बिरनाळे 10गुण); मध्यंतर: 14-11;
विद्यांचल: 52(लिलीयन जेकब 31गुण, तनरिका चक्रवर्ती 8गुण) वि.वि.डेक्कन जिमखाना अ: 45(हेतवी अमीन 9गुण, अनुशा सोनटक्के 17गुण); मध्यंतर: 18-25;
दस्तुर: 54(रुद्रानी हळीघोंगडे 19गुण, अरियाना शिंदे 9गुण) वि.वि.डेक्कन जिमखाना ब:38(सिया भोसले 21गुण, अनघा कर्वे 8गुण); मध्यंतर: 20-22;
मुले: उपांत्यपूर्व फेरी:
एबीसी: 49(दक्ष शर्मा 18गुण, अभिराज भाटी 8गुण) वि.वि.विद्यांचल: 26(शौर्य दळवी 14गुण); मध्यंतर: 25-13;

More Stories
चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत पहिल्या दिवशी एसके फ्लिपर्स, एएसआर डॉल्फिन्स संघांची धडाकेबाज कामगिरी
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ, राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी, नहाटा संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
तिसऱ्या कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आज 11 एप्रिलपासून आयोजन