April 14, 2026

पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत दस्तुर संघाला विजेतेपद

पुणे, ,14 एप्रिल, 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात दस्तुर संघाने विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत दस्तुर संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 56-55 असा कडवा प्रतिकार करत विजेतेपद पटकावले. दस्तूर संघाकडून रुद्राणी हळीघोंगडे(23गुण), बिनत कौर(17गुण) यांनी सुरेख कामगिरी बजावली. पराभूत संघाकडून अनुषा शेळके(17गुण) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. मध्यंतराला दस्तुर संघाने महाराष्ट्र मंडळ संघविरुद्ध 16-04 अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत लक्ष्मी जोशी(16गुण), लिलियन जेकब(22गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर विद्यांचल संघाने सेंट मेरीज संघाचा 42-27 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 40,000/- रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 20,000/- रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला करंडक व 10,000/- रुपये आणि मोस्ट व्हॅल्युएबल पुरस्कार दस्तुर संघाच्या रुद्राणी हळीघोंगडे हिला करंडक व 5,000/- अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेफमॅक्सचे आप्पासाहेब वीर आणि स्कॉनचे मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: अंतिम फेरी:
मुली:
दस्तुर: 56(रुद्राणी हळीघोंगडे 23गुण, बिनत कौर 17गुण) वि.वि.महाराष्ट्र मंडळ: 55(अनुषा शेळके 17गुण); मध्यंतर: 16-04;

3ऱ्या क्रमांकासाठी लढत:
विद्यांचल: 42(लक्ष्मी जोशी 16गुण, लिलियन जेकब 22गुण) वि.वि.सेंट मेरीज: 27(मेहेर सहानी 5गुण); मध्यंतर: 10-09;