पुणे, 14 एप्रिल 2026 : पूना क्लब यांच्या वतीने आयोजित चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत गतविजेत्या एएसआर डॉल्फिन्स संघाने अव्वल स्थान पटकावत विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब स्विमिंग पूल या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत सेरेना फिलानी, झायन इराणी, येवा रोपलेकर, अर्णव नंदा, विहान तुळपुळे, तैझुन बेकर, अवंतिका जिंदाल, अन्वया जोशी, अवीर सिंग, प्रीती मराठे, माधव क्षीरसागर यांच्या विजयी कामगिरी जोरदार एएसआर डॉल्फिन्स संघाने 119 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.
एसके फ्लिपर्स संघाने 99 गुणांसह उपविजेतेपद, तर जेट्स संघाने 95 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी वेंकीज, व्हेनकॉब व एनईसीसी हे मुख्य प्रायोजक आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लबचे अध्यक्ष व स्विमिंग विभागाचे सचिव गौरव गढोक, पूना क्लबच्या क्रीडा विभागाचे चेअरमन तुषार आसवानी आणि प्रायोजक व्हेनकॉबचे अमित रोपलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

More Stories
स्पर्धा व्यवस्थापनासाठी एआयटीए तर्फे नव्या स्वयंचलित(ऑटोमेटेड) प्रणालीची घोषणा
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देव रुपारेलिया, लक्ष्या राजेश यांना अग्रमानांकन