September 5, 2026

Pune: उद्याचा पाणी बंद रद्द, शहरात नियमित पाणी येणार

पुणे, १५ एप्रिल २०२६ : शहराच्या काही भागात टॅंकर चालकांनी पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात बुधवार सकाळपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळलेले नाही. त्यातच, उद्या ( गुरूवारी) महापालिकेकडून संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे या नागरिकांना ऐन उन्हाळयात सलग दोन दिवस पाणी मिळणार नाही. त्यामुळे महापालिकेकडून गुरूवारचा पाणी बंद मागे घेण्यात आला असून उद्या संपूर्ण शहरात नियमित पाणी येणार आहे. तसेच, देखभाल दुरूस्तीची कामे पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठीच्या पाणीबंदची तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.